उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना 5 लाखांचे बक्षिस; मुनगंटीवारांची मोठी घोषणा

0
1
Ganeshotsav Sudhir Mungantiwar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बापाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सन २०२३ च्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ५ लाखांचे बक्षिस देण्यात येणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षीच्या रक्कमेत सरकारने वाढ केल्यामुळे गणेश भक्तांच्या आनंदात आणखीन भर पडली आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला पाच लाख तर दुसऱ्या क्रमांकाला अडीच लाख आणि तिसऱ्या क्रमांकाला एक लाख रुपये बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत म्हंटल कि, दिनांक १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरु होणाऱ्या राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. या ट्विट मध्ये मुनगंटीवार यांनी एक पोस्टर शेअर करुन त्यामध्ये स्पर्धेविषयी माहिती दिली आहे.

त्यामध्ये गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या Mahotsav.plda@gmail.com या इमेलवर दि.१०/६/२३ ते दि. ५/९/२३ पूर्वी ऑनलाईन अर्ज भरण्यास सांगितले आहे. यासाठी रू. २४ लाख ६० हजार इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याचे देखील सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केले आहे.