पुणे- बंगळूर महामार्गावर अपघातात एकाच कुटुंबातील 5 जण ठार : चारचाकीचा चक्काचूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कासेगाव | पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गवर कासेगाव जवळ शनिवारी दि. 4 जून रोजी कार व कंटनेरचा आज भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला.  पुण्याहून सांगलीकडे निघालेल्या मार्गावर ही दुर्घटना घडली असून गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला होता.

कराड तालुक्यातून पुढे गेल्यानंतर काही अंतरावर कासेगावजवळ हा भीषण अपघात शनिवारी 4 वाजण्याच्या सुमारास झाला आहे. अपघातातील मृत जयसिंगपूर येथील आहेत. अरिंजय आण्णासो शिरोटे, स्मिता अभिनंदन शिरोटे, सुनेशा अभिनंदन शिरोटे, विरु अभिनंदन शिरोटे अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

याबाबत कासेगाव पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कारमधून (एम एच- 14 डी. एन. 6339) मृत कुटुंब पिंपरी – चिंचवडहून जयसिंगपूरकडे निघाले होते. यावेळी कासेगावजवळील येवलेवाडी फाटा येथे कार रस्त्याकडेला थांबलेल्या कंटेनरला (एमएच- 05- एएम- 3644) पाठीमागून जोरात धडकली. या अपघातात कारमधील 5 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 2 जागेवर तर 3 जण उपचारासाठी दवाखान्यात दाखल करताना मृत्यू पावले.

गाडीचा चक्काचूर… रक्ताचा सडा

कासेगावजवळ येथे चारचाकी झालेल्या अपतातील कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला होता. गाडीचा वरील टप व दरवाजे पूर्णपणे तुटलेले होते. वरचा भाग पूर्णपणे उडाला होता. तर आतील सिटचा भागही तुटलेला होता. रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला होता.

Leave a Comment