हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stocks : 2022 या आर्थिक वर्षामध्ये शेअर बाजारात अनेक चढ-उतार दिसून आले. या वर्षाच्या सुरुवातीलाच शेअर बाजारावर मंदीचा दबाव दिसून आला. मात्र, याच्या सहा महिन्यानंतर शेअर बाजार पूर्णपणर तेजीत आला. या वर्षात बीएसई सेन्सेक्स आतापर्यंत 5.66 टक्क्यांनी वाढला आहे.
हे लक्षात घ्या कि, शेअर बाजारातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सने या वर्षी गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. या शेअर्सवर बाजारातील चढ-उताराचा कोणताही परिणाम झालेला नाही. आजच्या या बातमीमध्ये आपण अशाच काही Multibagger Stocks बाबतची माहिती जाणून घेणार आहोत.
SEL Manufacturing Company Limited : 2022 मध्ये या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉक ठरले आहेत. टेक्सटाईल सेक्टरमधील या कंपनीच्या शेअर्सने आतापर्यंत गुंतवणूकदारांना 1,431.98 टक्के रिटर्न दिला आहे. 3 जानेवारी 2022 रोजी 44.40 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आता 680.20 रुपयांच्या पातळीवर आहेत. Multibagger Stocks
Sejal Glass Limited : ग्लास सेक्टर मध्ये काम करणाऱ्या या कंपनीचे शेअर्स 2022 मध्ये मल्टीबॅगर स्टॉक ठरले आहेत. 2022 मध्ये या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 891.96 टक्के रिटर्न दिला आहे. 3 जानेवारी 2022 रोजी 25.50 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आता 252.95 रुपयांच्या पातळीवर आहेत. Multibagger Stocks
Kaiser Corporation Ltd.: प्रिंटिंग आणि पॅकेजिंग सर्व्हिस देणारी ही कंपनी लेबल, पॅकेजिंग साहित्य, मासिके आणि कार्टन्स छापते. 2022 मध्ये आतापर्यंत या शेअर्सने गुंतवणूकदारांना 1,843.49 टक्के मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. 3 जानेवारी 2022 रोजी 2.92 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आता 56.75 रुपयांच्या पातळीवर आहेत. Multibagger Stocks
Raj Rayon Industries Limited : या कंपनीच्या शेअर्सने 2022 मध्ये सर्वाधिक रिटर्न दिला आहे. या वर्षी या शेअर्सने गुंतवणूकदारांना तब्बल 2,481.48 टक्के रिटर्न दिला आहे. हे लक्षात घ्या कि, ही कंपनी पॉलिस्टर टेक्सच्युराइज्ड यार्न, ओरिएंटेड यार्न आणि पूर्णपणे ड्रॉ यार्नच्या उत्पादनात गुंतलेली आहे. 3 जानेवारी 2022 रोजी 1.35 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आता 34.85 रुपयांच्या पातळीवर आहेत.
Amber Protein Industries Limited : 1992 मध्ये अहमदाबादमध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली. या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अंकुर रिफाइंड कॉटनसीड ऑइल, अंकुर रिफाइंड सनफ्लॉवर ऑइल, अंकुर रिफाइंड सोयाबीन ऑइल आणि अंकुर रिफाइंड कॉर्न ऑइल यांचा समावेश आहे. 2022 मध्ये आतापर्यँत या शेअर्सने गुंतवणूकदारांना 2,362.92 टक्के मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. 4 जानेवारी 2022 रोजी 22.25 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आता 548 रुपयांच्या पातळीवर आहेत. Multibagger Stocks
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/ambar-protein-industries-ltd/ambarpil/519471/
हे पण वाचा :
AU Small Finance Bank : देशातील ‘या’ सर्वात मोठ्या स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या व्याजदरात केली वाढ
Income Tax बाबत मोठा दिलासा, कर सवलतीबाबत एक नवा आदेश जारी
Business Idea : फक्त 1000 रुपयांच्या गुंतवणुकीद्वारे ‘या’ व्यवसायातून भरपूर उत्पन्न
Cashback Offers : LPG गॅस सिलेंडरच्या बुकिंगवर अशा प्रकारे मिळवा 50 रुपयांचा गॅरेंटेड कॅशबॅक !!!
गेल्या 5 वर्षांत ‘या’ Multibagger Stock गुंतवणूकदारांना दिला 400% पेक्षा जास्त रिटर्न