हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गाझामध्ये (Gaza) मदत सामग्री असलेले पॅराशूट अंगावर पडून तब्बल 5 जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना पॅराशूट (Parachute Fails) हवेत उडले न गेल्यामुळे घडली आहे. ज्यात 5 जणांनी आपला जीव गमावला आहे, तर अनेकजण जखमी असल्याचे सांगितले जात आहे. याबाबतची माहिती प्रत्यक्षदर्शींनी आणि हमासच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. सध्या पोलीस यंत्रणा या सर्व घटनेचा तपास करीत आहे. त्यांनी काही जखमींवर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, इस्राइलबरोबर झालेल्या युद्धात गाझाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या कारणामुळे गेल्या अनेक दिवसांपासून यूएस, जॉर्डन, इजिप्त, फ्रान्स, नेदरलँड आणि बेल्जियम गाझामध्ये मदत पुरवली जात होती. ही मदत हवेतून पुरवण्यात येत होती. शुक्रवारी देखील पॅराशुटच्या साह्याने जॉर्डनियन एअर फोर्स गाझाच्या लोकांना मदत पुरवत होती. परंतु याचवेळी पॅराशूट हवेत न उडल्यामुळे ते थेट खाली कोसळले. ज्यामुळे खाली असलेल्या पाच लोकांचा मृत्यू झाला. तर अनेकांना गंभीर दुखापत झाली. ही घटना सकाळी ठीक 11.30 च्या सुमारास घडली.
मुख्य म्हणजे, या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये कार्गो सी-१७ येथून अल-शफ्ती येथे मदत सामग्री हवेतून खाली पडताना दिसत आहे. तर यातीलच काही मदत सामग्री व्यवस्थितपणे जमिनीवर उतरल्याचे पाहिला मिळत आहे. परंतु यातीलच एक पॅराशूट जमिनीवर असलेल्या लोकांच्या अंगावर पडल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. दरम्यान, सध्या उत्तर गाजातील काही भाग मदतीपासून वंचित राहिला आहे. त्यामुळेच या भागातील लोकांना पॅराशूटने मदत पोहोचवण्यात येत होते. याचवेळी ही मोठी दुर्घटना घडली आहे.