फ्रिजमधील शिळी भाजी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 5 लोकांना विषबाधा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल जवळपास प्रत्येकाच्या घरी फ्रीज असतो. फ्रीजमध्ये आपण उरलेले अन्न ठेवत असतो. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे अन्न गरम करून किंवा तसेच खातो. परंतु फ्रिजमध्ये अन्न ठेवून खाण्याची सवय सवय एक दिवस तुमच्या जीवावर बेतू शकते. कारण आता एका तालुक्यामध्ये एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींना फ्रीजमधील शिळी भाजी खाल्ल्यामुळे विषबाधा झालेली आहे.

फ्रिजमध्ये ठेवलेली शिळी भाजी खाल्ल्यामुळे या कुटुंबातील पाच लोकांना विषबाधा झालेली आहे. आणि त्यांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलेले आहे. विषबाधा झालेल्या व्यक्तीची नावे ताराबाई कुंभरे, शालिनी कुंभरे, गोवर्धन कुंबळे, सुजीता कुंभरे, आणि दुर्गा कुंभरे असे आहे. ताराबाई कुंभरे यांच्या घरी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमात त्यांनी उडदाच्या डाळीच्या वड्यांची भाजी बनवली होती. कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी उरलेली भाजी फ्रिजमध्ये ठेवली. आणि दुसऱ्या दिवशी ती भाजी गरम करून पाच जणांनी खाल्ली. आणि त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना सरांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलेले आहे.

धार्मिक कार्यक्रमाला आलेल्या अनेक लोकांनी ही भाजी खाल्ली होती परंतु त्यातील कोणालाही त्रास झाला नाही. जेव्हा या कुटुंबाने भाजी रात्री फ्रिजमध्ये ठेवली. आणि दुसरा दिवशी भाजी खाल्ली त्यानंतर रस्त्यांना विषबाधा झाली. त्यामुळे त्यांना झालेली विषबाधा ही फ्रिजमध्ये ठेवलेल्या शिळ्या भाजीमुळे झाली असावी, असा अंदाज डॉक्टरांकडून देखील व्यक्त केला जात आहे.

कोणते पदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नये

मसाले

मसाले कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये, फ्रिजमध्ये मसाले ठेवल्यानंतर ते ओलसर होऊ शकतात. तसेच ते गोठू देखील शकतात. त्यामुळे हे मसाले खराब होतात. आणि तेच खराब झालेले पदार्थ आपण अन्न बनवण्यासाठी वापरतो.

ब्रेड

ब्रेड हा मैद्यापासून बनवलेला असतो. तुम्ही जर तो ब्रेड फ्रीजमध्ये ठेवला, तर तो लवकर खराब होऊ शकतो. तसेच तो ब्रेड लवकर सुकतो आणि कडक देखील होतो. तसेच त्यावर बुरशी जमा होण्याची शक्यता असते.

सुकामेवा

सुकामेवा कधीच फ्रिजमध्ये ठेवू नये. फ्रिजमध्ये असणारा थंडपणा आणि आद्रता यामुळे सुक्या मेव्याची चव बिघडते आणि सुका मेवा लवकर खराब होण्याची शक्यता असते.

केसर

आरोग्य तज्ञांच्या मते केसर हे फ्रिजमध्ये कधीच ठेवू नये. त्यामुळे त्याची आद्रता वाढते आणि केसरमध्ये गुठळ्या तयार होतात. त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ.

अन्नपदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्यावर काय परिणाम होतो ?

तुम्ही जर कोणतेही अन्नपदार्थ फ्रिजमध्ये ठेवले तर त्याच्या चवीवर परिणाम होतो जर तुम्ही गरम पदार्थ फ्रीजमध्ये ठेवला तर त्याचा इतर खाद्य बदलतांवर परिणाम होतो बर्फाचे स्पटिक तयार होऊ लागतात. आणि त्या पदार्थाची चव आणि पोत देखील खराब होऊ शकते.