सेकंड हँड Swift खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 5 महत्वाच्या गोष्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात विकल्या जाणार्‍या सर्वात लोकप्रिय कारपैकी मारुती सुझुकी Swift ही देखील एक आहे. 2005 मध्ये पहिल्यांदा स्विफ्ट लाँच करण्यात आली होती. हे लक्षात घ्या कि, भारतात या कॉम्पॅक्ट हॅचबॅकच्या आतापर्यन्त तीन जनरेशन लॉन्च केल्या गेल्या आहेत. तसेच 2018 मध्ये लाँच करण्यात आलेले थर्ड-जनरेशन मॉडेल हे फेसलिफ्टसहीत लॉन्च करण्यात आले होते. या स्विफ्टची सध्याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 6.57 लाख रुपये ते 9.88 लाख रुपये आहे.

जर आपल्यालाही कार खरेदी करायची असेल मात्र बजट कमी असेल तर सेकंड हँड मॉडेल खरेदी करण्याबाबत विचार करता येईल. सध्या या जनरेशनची Swift 4 वर्षांपासून बाजारात उपलब्ध आहे. सेकंड हँड कार मार्केटमध्ये याचे चांगले मॉडेल्स देखील मिळू शकतील. मात्र, सेकंड हँड कार खरेदी करण्याआधी काही 5 गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात…

Maruti Suzuki Swift Price, Images, Reviews and Specs | Autocar India

1. या कारच्या आधीच्या मॉडेल्सच्या तुलनेत थर्ड जनरेशनच्या मारुती सुझुकी Swift ची बिल्ड क्वालिटी खूपच चांगली आहे. याशिवाय, हे कंपनीच्या Heartect प्लॅटफॉर्मवर तयार केले गेले असल्याने जास्त रिगिड देखील आहे. ज्यामुळे कारला आणखी सुरक्षितता मिळते.

2. आता Swift फक्त पेट्रोल इंजिनमध्येच उपलब्ध आहे, मात्र एप्रिल 2020 आधी ते 1.3-लिटर डिझेल इंजिनसहित विकले जात होते. या इंजिनद्वारे 74 bhp पॉवर आणि 190 Nm पीक टॉर्क मिळत असे. जर आपल्यालाही पेट्रोल कार घ्यायची असेल तर स्विफ्टची 1.2-लीटर कार चांगला पर्याय ठरू शकेल. हे इंजिन खूप वेगवान असून याद्वारे 82 Bhp पॉवर आणि 115 Nm पीक टॉर्क मिळेल.

2017 Suzuki Swift görücüye çıkarıldı!

3. या थर्ड जनरेशन स्विफ्टमध्ये अनेक चांगले फीचर्स देखील आहेत, जे मागील जनरेशनच्या अनेक मॉडेल्समध्ये देण्यात आलेले नव्हते. यामध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, स्पोर्टी अलॉयज, अ‍ॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसहीत टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि बरेच काही मिळेल. मात्र, यांपैकी बहुतेक हाय-स्पेक व्हेरिएंटपुरतेच मर्यादित आहेत.

4. हे लक्षात घ्या कि, मारुती सुझुकी स्विफ्टला ग्लोबल NCAP कडून कधीही समाधानकारक सेफ्टी रेटिंग मिळालेले नाही. खरं तर, मागील जनरेशनच्या कारला झिरो-स्टार सिक्योरिटी रेटिंग मिळाले आहे. मात्र, थर्ड जनरेशनच्या मॉडेलला 2-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.

Maruti Suzuki Swift Vxi On-Road Price, Specs , Features & images

5. थर्ड जनरेशन स्विफ्ट अजूनही नवीन कार आहे, त्यामुळे जुनी कार देखील थोडी स्वस्त असेल. तसेच कारच्या मॉडेलचे वर्ष आणि व्हेरिएंटनुसार, सेकंड हॅन्ड स्विफ्ट सुमारे 5.5 लाख ते 7.5 लाख रुपयांमध्ये मिळू शकेल. तसेच, मारुती सुझुकीच्या Swift कारला चांगली व्हॅल्यू मिळत असल्याने 3-4 वर्षांनी जर आपण कार विकण्याचे ठरवले तर चांगला रिटर्न मिळण्याची खात्री आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.carwale.com/maruti-suzuki-cars/swift/

हे पण वाचा :
Atal Pension Yojana मध्ये पैसे जमा करता येत नसतील तर ताबडतोब करा ‘हे’ काम
Suryoday Small Finance Bank च्या FD वर मिळेल 9% पेक्षा जास्त व्याज
Gold Price : सोने चांदी महागले, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
UPI Transaction Limit : UPI द्वारे पैसे पाठवण्याचे लिमिट किती आहे ते जाणून घ्या
PAN-Aadhaar Link : 31 मार्चपर्यंत ‘हे’ काम करा अन्यथा पॅन कार्ड होईल निष्क्रिय