अचानक उद्भवलेल्या दुर्मिळ आजारावर उपचार करण्यासाठी 50 लाखांची गरज; पत्नी अन् मुलाकडून पैसे गोळा करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । मेडिकल दुकानावर काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महेश हरिश्चंद्र शिनकर (48) ह्यांना गिलीयन बार सिंड्रोम (Guillain-barre Syndrome) ह्या दुर्मीळ आजाराची लागण झाली असून, ते गेल्या 15 दिवसांपासून उपचार घेत आहेत. सुरवातीला काही दिवस सह्याद्री हॉस्पिटल डेक्कन येथे उपचार्थ दाखल झाले होते, मात्र तेथील उपचार खर्चिक असल्याने त्यांना डी वाय पाटील, पिंपरी येथील रुग्णालयात सध्या भरती करण्यात आले आहे. महेश यांच्या उपचारासाठी दानशूर व्यक्ती तसेच सेवाभावी संस्थांनी पुढे येऊन मदत करावी असे आवाहन शिनकर कुटुंबियांनी केले आहे.

मेडिकल लाईन मध्ये अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या महेश शिनकर यांच्या कुटूंबालाच आता त्यांच्या मेडिकल व इतर वैद्यकीय खर्चासाठी धावाधाव करावी लागत आहे. अत्यंत तुटपुंज्या पगारावर आपल्या संसाराचा गाडा चालवणाऱ्या महेश यांच्या पत्नी वैशाली शिनकर व 17 वर्षीय मुलगा कार्तिक यांच्या पुढे खूप मोठे संकट उभे राहिले आहे.

पती महेश यांच्या वैद्यकीय उपचारासाठी पत्नीची खूप धावपळ सुरू आहे. यंदा इयत्ता बारावीला असलेला मुलगाही आपल्या वडीलांसाठी आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करत आहे. सामान्य परिस्थिती असलेलं सुखी कुटुंब अचानक ह्या चक्रव्यूहात अडकलं आणि त्यात कुटूंब प्रमुखच असलेली व्यक्तीचं आजारी पडणं, त्यामुळे उत्पनांच साधन संपण… ह्या कठीण काळात समाजातील दानशूर व्यक्तींकडे आपोआपच मोठ्या आशेने बघितलं जात.

अत्यंत जेमतेम कौटुंबिक परिस्थिती असल्याने ह्या उपचारासाठी खर्च हा अशक्य कोटीचा असल्याने आपल्या मदतीची आज ह्या कुटुंबाला खूप गरज आहे. हॉस्पिटल प्रशासनाकडून साधारणपणे 40 ते 50 लाख रुपयांपर्यंत खर्च होऊ शकेल असे सांगण्यात आले आहे. समाजाचा आर्थिक हातभार लाभल्यास एक कुटुंब नक्की सावरू शकतं, त्यामुळे समाजातून ह्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी आणि रुग्ण सुखरूप घरी जावे हीच अपेक्षा.

गिलीयन बार सिंड्रोम म्हणजे काय?
गिलीयन बार सिंड्रोम (Guillain barre syndrome) हा एक दुर्मिळ आजार आहे. ज्यामध्ये शरीराच्या रोगप्रतिकारक शक्ती (Antibody) मुळे आरोग्यावर वाईट दुष्परिणाम होत असल्याचं दिसतंय. शरीरातील Antibody ह्या मज्जातंतूंच्या (nerve system) पेशींवर हल्ला करते. सदर आजार पसरण्याचे कुठलेही प्रकरण अजून तरी समोर आले नाही आहे. आतापर्यंत भारतात साधारण 10 ते 15 केसेस आढळल्या आहेत. यातील केरळ राज्यात सात प्रकरणे आहेत.

मदतीसाठी आपण खालील क्रमांकावर संपर्क साधू शकतो व मदत करू शकता.

Name :- Mrs.Vaishali Mahesh Sinkar
Bank Name :- The Cosmos CO-OP. Bank LTD
Branch :- Gandhibhavan, Kothrud.
IFSC :- COSB0000908
Acct. No :- 9080501026488
Gpay No :- 8793205654
________
Contact No. Umesh Shinkar
+91 89990 74793