हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tecno Pova 4 : सध्याच्या डिजिटल काळात अनेक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. नुकतेच भारतात Tecno Pova 4 लॉन्च करण्यात आला आहे. हे लक्षात घ्या हा नवीन स्मार्टफोन Tecno Pova 3 चा अपग्रेड असेल. या नवीन फोनमध्ये MediaTek Helio G99 प्रोसेसर देण्यात आलेला आहे. यासोबतच फोनच्या बॅक पॅनलमध्ये डायमंड कट डिझाईनही देण्यात आले आहे.
Tecno Pova 4 च्या सिंगल 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. तसेच हा फोन ब्लू आणि ग्रे कलर ऑप्शनमध्ये लाँच केला गेला आहे. 13 डिसेंबरपासून ग्राहकांना Amazon वर हा नवीन स्मार्टफोन उपलब्ध आहेत. चला तर मग या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स बाबतची आणखी माहिती जाणून घेऊयात…
या नवीन Tecno Pova 4 स्मार्टफोनमध्ये Android 12 बेस्ड HiOS 12 ऑपरेटिंग सिस्टीम आहे. यासोबतच 180Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 90Hz रिफ्रेश रेटचा 6.82-इंच HD+ (1640×720 पिक्सेल) IPS LCD डिस्प्ले देखील दिला गेला आहे. या स्मार्टफोनमध्ये Mali G57 GPU, 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसहीत MediaTek Helio G99 प्रोसेसर आहे.
फोटोग्राफीसाठी Tecno Pova 4 या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे. यासोबतच LED फ्लॅशसह AI लेन्स देखील देण्यात आली आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये फ्रंट साईडला 8MP कॅमेरा देण्यात आलेला आहे.
6000mAh ची बॅटरी असलेला हा स्मार्टफोन 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. Tecno Pova 4 चे वजन 212 ग्रॅम आहे आणि त्याचे माप 170.59 × 77.52 × 8.7 मिमी आहे. कनेक्टिव्हिटी बाबत बोलायचे झाल्यास 4G, ड्युअल सिम, Wi-Fi 802.11 ac, ब्लूटूथ 5, GPS, Glonass आणि Beidou साठी सपोर्ट आहे. इथे बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर देखील बसवला गेला आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.tecno-mobile.com/bd/phones/product-detail/product/pova-4-2/
हे पण वाचा :
Business Idea : भरपूर मागणी असलेला ‘हा’ व्यवसाय सुरू करून मिळवा मोठा नफा
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम, अन्यथा येऊ शकेल अडचण
Yes Bank च्या FD वरील व्याजदरात बदल, असे असतील नवीन दर
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात उसळी, आजचे नवीन दर तपासा
Axis Bank देखील FD वर देणार जास्त व्याज, जाणून घ्या नवीन व्याजदर