सातारा जिल्ह्यात गारपिटीचा 6 तालुक्यातील 51 गावांना फटका

Unseasonal Rain Hailstorm Nimsod News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात सध्या ठिकठिकाणी गारपिटीचा पाऊस पडत असल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मार्च महिन्यात अवकाळी पाऊस होऊन दीड हजार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच आताच्या वळवाच्या तडाख्याचाही शेकडो बळीराजाला फटका बसला आहे. काल वडूजसह खटाव तालुक्यास गारपिटीने चांगलेच झोडपून काढले. तर गत आठवड्यातच 6 तालुक्यांत गारपीट झाली आहे. शिवाय 51 गावे बाधित झाली असून यामध्ये 350 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. सुमारे 7 कोटींवर शेतीपिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

कोरेगाव तालुक्यातही गारपीट होऊन 18 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या तालुक्यातीलही 6 गावांना दणका बसला आहे. माण तालुक्यातील 4 गावांत गारपिट झाली. यामध्ये 43 हेक्टरवरील बागा आणि पिकांना फटका बसलाय. महाबळेश्वर तालुक्यात 48 हेक्टर क्षेत्राला फटका बसला. 17 गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. तर खंडाळा तालुक्यात 6 गावे बाधित असून 10 हेक्टरवरील पिके आणि बागांचे नुकसान झाले आहे. जावळीत 5 गावांतील 3 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

वाईत फळपिके सोडून बागायत पिकांखालील बाधित क्षेत्र हे 220 हेक्टर होते, तर याचा फटका 1,197 शेतकऱ्यांना बसलेला आहे. महाबळेश्वर तालुक्यात 64 हेक्टरवरील पिके अवकाळीमुळे बाधित झाली. यामुळे 240 बळीराजांचे नुकसान झाले. तर माण तालुक्यात 19 हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि 11 हेक्टरवरील फळबागांना फटका बसला आहे.माण तालुक्यात एकूण अवकाळी बाधित क्षेत्र हे 30 हेक्टर, तर 60 शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले हाेते. यामधून शेतकरी सावरत असतानाच आठ दिवसांपासून वळवाचा तडाखा जिल्ह्यात बसत आहे. यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे पुन्हा मोडले आहे.

शेतकरी मित्रांनो, तुम्हांला सुद्धा सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आता कोणत्याही सरकारी कार्यालयात चकरा मारण्याची आवश्यकता भासणार नाही. आजच Hello Krushi हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्या आणि घरात बसून सर्व योजनांचा फायदा घेण्यासाठी अर्ज करा. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च करावा लागणार नाही. याव्यतिरिक्त हॅलो कृषी मध्ये सातबारा उतारा, जमीन मोजणी, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज, आसपासची खत दुकानदार, कृषी केंद्र, पशु- खरेदी विक्री यांसारख्या अनेक सुविधा अगदी मोफत मध्ये मिळतात. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हॅलो कृषी डाउनलोड करा.

Hello Krushi डाउनलोड करण्यासाठी Click Here

खटाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान

डाळिंब, टोमॅटो, मका, केळी, आंबा, घास, भेंडी, कांदा, गवार, ऊस आदी उन्हाळी पिकांना या गारपिटीने अक्षरशः झोडपल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडेही उन्मळून पडली आहेत. वळवाच्या पाऊसामुळे जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान खटाव तालुक्यात झालेले आहे. 13 गावांतील शेतकऱ्यांना फटका बसला असून सुमारे 225 हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये अधिक करुन द्राक्षबागांचेच नुकसान आहे.

तब्बल 86 लाख रुपयांचे शेतीचे नुकसान

अवकाळी पावसामुळे सातारा जिल्ह्यातील तीन तालुक्यातील शेतीला फटका बसला होता. यामध्ये 85 लाख 73 हजार रुपयांचे पीक आणि बागांचे नुकसान झाले होते. वाई तालुक्यात सर्वाधिक 59 लाख 32 हजारांचे नुकसान झालेले. यानंतर महाबळेश्वर तालुक्यात 17 लाख 28 हजार, तर माणमध्ये 9 लाख 14 हजारांचे नुकसान झाले होते.