सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सोमवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये सातारा जिल्ह्यातील ५१४ जण बाधित आले आहेत. तर चोवीस तासांत जिल्ह्यात ६ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोरोना बांधितांची होणारी वाढ सोमवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये पाचशेपार बांधितांचा आकडा आलेला आहे. मात्र तरीही समाधानकारक कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झालेली नाही. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांचा संख्या ६९ हजार २३३ आहे. तर जिल्ह्यात एकूण ६१,३७९ बरे झालेली रुग्णसंख्या आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण १९२४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सध्या जिल्ह्यात ५ हजार ०५५ उपचारार्थ दाखल रुग्ण आहेत. कोरोना बाधितांची वाढणारी संख्या जिल्ह्यासाठी चिंताजनक आहे. प्रशासनाकडून निर्बंध कडक करण्यात आले असून नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकार शेखरसिंह यांनी दिली आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा