धक्कादायक! Facebook युजर्संचे फोन नंबर विक्रीला, टेलिग्रामवर होतेय विक्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जवळपास ५३ कोटी फेसबुक युजर्संचे फोन नंबर लीक झाले असून या फोनची विक्री टेलिग्रामवर केली जात असल्याचा धक्कादायक दावा करणारा एक रिपोर्ट समोर आला आहे. फेसबुक युजर्संचा डेटाला विकण्यासाठी टेलग्राम बॉटचा वापर केला जात आहे. रिपोर्टमध्ये केलेल्या खुलाशानुसार, बॉट चालवणाऱ्या ५३ कोटी फेसबुक युजर्सची माहिती आहे. यात ६ लाखांहून जास्त भारतीय युजर्संचा डेटाचा समावेश आहे.

Motherboard (Vice) च्या रिपोर्टनुसार, एक सिक्योरिटी रिसर्चर अ‍ॅलन गलने सांगितले की, फेसबुक युजर्सचे फोन नंबरला टेलिग्रामवर विकले जात आहे. विकणाऱ्यांनी टेलिग्राम बॉटचा वापर केला आहे. या डेटाबेसला फेसबुक मध्ये आलेल्या एका सिक्योरिटी समस्या दरम्यान चोरले गेले होते. याला फेसबुकने २०१९ मध्ये ठीक केले होते. डेटाबेसमध्ये ६ लाख भारतीयांचा समावेश आहे. याशिवाय अनेक देशाचा समावेश आहे. याची संपूर्ण यादी ट्विटवर शेयर करण्यात आली आहे.

टेलिग्रामवर फेसबुक युजर्संचा डेटा विक्रीबाबत रिपोर्टमध्ये म्हटलंय कि, जर कोण्या व्यक्तीकडे एखाद्या व्यक्तीचा फेसबुक युजर आयडी असेल तर त्या व्यक्तीचा फोन नंबर मिळू शकतो. किंवा त्या व्यक्तीकॅच फोन नंबर असेल तर त्यावरून त्या व्यक्तीचा फेसबुक आयडी मिळू शकतो. बॉटद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, अनलॉक करण्यासाठी एक क्रेडिट लागेल. एका व्यक्तीला २० डॉलर किंमत द्यावी लागते जी भारतात जवळपास १४५० रुपये इतकी आहे. गॅलने काही स्क्रीनशॉट शेयर केले आहेत. यावरून उघड होत आहे की, बॉटला १२ जानेवारी २०२१ रोजी अ‍ॅक्टिव करण्यात आले आहे. परंतु, विकला जाणारा डेटा २०१९ चा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment