राज्यात 55 टक्के मतदान, शहरी भागात मतदान घटले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. अनेक दिग्गजांनी सकाळी सातच्या ठोक्याला मतदानाचा हक्क बजावला. येत्या 24 तारखेला निवडणुकांचे निकाल हाती येतील. 3 हजार 237 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात एकूण ५५ टक्के मतदान झालं. ग्रामीण भागात अधिक मतदानाची नोंद झाली. तर शहरी भागात मात्र मतदान कमीच झालं.

मुख्यमंत्रांचा बालेकिल्ला असणाऱ्या नागपूर जिल्ह्यात सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.98 टक्के मतदानाची नोंद झाली. वाशिम जिल्ह्यात 56.65 टक्के मतदानाची नोदं झाली, ठाण्यात सुमारे 44.50 टक्के मतदानाची नोंद झालीये. वर्धा मतदारसंघात 56.86 टक्के इतकं मतदान झालं. हिंगोलीत एकूण मतदानाची टक्केवारी 63.06 इतकी आहे. सोलापूर जिल्ह्यात जवळपास 55.55 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक 67.62 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. बुलढाण्यात 58.87 टक्के मतदान झालं. पुण्यात 52.55 टक्के मतदानाची नोंद झाली.

सातारा जिल्ह्यात 60.99 टक्के मतदानाची नोंद झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील ६ मतदारसंघात 55.84 टक्के मतदानाची नोंद आहे. अमरावती जिल्ह्यात 56.02 टक्के मतदानाची नोंद झाली. परभणीत 61.51 टक्के मतदान झालं. रायगड जिल्हयात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.98 टक्के मतदान झालं, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 60.83 टक्के मतदान झालं. मुंबई सरासरी 44 टक्के मतदान झालं. नशिकमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 54.54 टक्के मतदान झालं. राज्यात असं एकूण 55 टक्के मतदान झालं.

Leave a Comment