Wednesday, February 8, 2023

धक्कादायक ! डोळ्यावर पट्टी बांधून विद्यार्थिनीवर अत्याचार

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – शनिवारी दुपारी कळमना या भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. डोळ्याला पट्टी बांधून बारावर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला नागरिकांनी रंगेहाथ पकडून चांगलाचा चोप दिला आहे. या नराधमाचे नाव डोलचंद चव्हाण असे आहे. एक मुलगी सातवीच्या तर तिची मैत्रीण सहावीच्या वर्गात शिकत आहेत. मुलीचे आई वडील मोलमजुरीचे काम करतात.

शनिवारी दुपारी या दोघीजणी आपल्या अंगणात खेळत होत्या. तेव्हा डोलचंद याने दोघींना ‘आंधळी कोशिंबिर’ खेळण्याच्या बहाण्याने आपल्या घरात बोलावले. या दोघीजणी त्याला ओळखत असल्याने त्या लगेच तयार झाल्या. त्याने त्या दोघींच्या डोळ्यावर पट्टी बांधली. त्यानंतर त्याने त्या १७ वर्षीय मुलीवर अत्याचार केला.

- Advertisement -

यानंतर मुलीने आरडा-ओरड सुरु केली. तेव्हा तिची आरडा-ओरड ऐकून शेजारी मदतीला धावले तेव्हा मुलगी रडत होती. घडलेला प्रकार जेव्हा नागरिकांच्या लक्षात आला तेव्हा ते संतापले आणि त्यांनी त्या आरोपीला चांगलाच चोप दिला. या घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.