धक्कादायक!! उष्माघातामुळे तब्बल 550 हज यात्रेकरूंचा मृत्यू; अनेकांवर उपचार सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानाने जगभरातील नागरिकांना हैराण करून सोडले आहे. यामध्ये उष्माघातामुळे अनेक लोकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. अशातच सौदी अरेबियातूनही (Saudi Arabia) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याठिकाणी अति उष्णतेमुळे सुमारे 550 हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. सौदी अरेबियातील तापमानाने 50 अंशांचा टप्पा ओलांडल्यानंतर नागरिकांना याचा प्रचंड त्रास होताना दिसून आला. अशा परिस्थितमुळेच अनेक हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला.

गेल्या काही दिवसांपासून ईदच्या निमित्ताने हजला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या संकेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. यातील अनेक यात्रेकरूंना उष्माघाताचा त्रास झाला. यामुळेच तब्बल 550 हज यात्रेकरूंना आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबतची माहिती मंगळवारी सौदी सरकारकडून देण्यात आली आहे. मृत झालेल्या यात्रेकरूंमध्ये 323 इजिप्त लोकांचा समावेश असल्याचे ही सरकारने सांगितले आहे. या घटनेनंतर हज यात्रेकरूंनी तब्येतीची काळजी घ्यावी, असे आवाहन ही सरकारने केले आहे.

दरम्यान, दरवर्षी लाखोंच्या संख्येने ईदच्या काळामध्ये मुस्लिम बांधव हज यात्रेला जात असतात. गेल्या वर्षी हज यात्रेला गेलेल्या सुमारे 240 यात्रेकरुंचा उष्णतेमुळे मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा 550 हज यात्रेकरूंचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात उष्णतेमुळे अनेक यात्रेकरू आजारी पडले आहेत. ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.