देशातील कोरोनाबाधितांची संख्या २७ लाखांवर; मागील २४ तासांत ५५,०७९ नवे रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये देशात ५५ हजार ०७९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यासोबतच देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येनं २७ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. याशिवाय मागील २४ तासांत ८७६ रुग्णांच्या मृत्यूंचीही नोंद झाली आहे.

देशात १७ ऑगस्टपर्यंत ३ कोटी ९ लाख ४१ हजार २६४ जणांची करोना चाचणी करण्यात आली. देशात सध्या ६ लाख ७३ हजार १६६ अॅक्टिव्ह केसेस आहे. तर १७ ऑगस्ट रोजी देशात ८ लाख ९९ हजार ८६४ करोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली. आतापर्यंत १९ लाख ७७ हजार ७८० जणांनी कोरोनावर मात केल्याची माहिती आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आली. तसंच देशातील एकूण मृतांची संख्या वाढून ५१ हजार ७९७ इतकी झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment