उपचारार्थ बाधित वाढले : सातारा जिल्ह्यात 560 पाॅझिटीव्ह तर शुक्रवारी 167 कोरोनामुक्त

सातारा | जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 560 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. तर 167 जणांना शुक्रवारी दिवसभरात घरी सोडण्यात आले आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात

जावली 4 (9830), कराड 78 (38089), खंडाळा 19 (13866), खटाव 115 (24471), कोरेगांव 62 (21178), माण 39 (21178), महाबळेश्वर 0 (4590), पाटण 13 (9981), फलटण 124 (35164), सातारा 89 (49567), वाई 11 (15411) व इतर 6 (1924) असे आज अखेर एकूण 241107 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या वाई 1 अशी असून आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 6 हजार 59 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 167 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. सातारा जिल्ह्यात आजपर्यंत 10 हजार 349 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

You might also like