आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये 6 एअरबॅग बंधनकारक; गडकरींची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये 6 एअरबॅग (Road Safety And 6 Airbags Car) अनिवार्य केल्याची घोषणा केली आहे. चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्यांची सुरक्षा वाढवण्यासाठी मोठी घोषणा सरकार कडून करण्यात आली आहे.

नितीन गडकरी यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल की, आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता या चारचाकी वाहनांमध्ये किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत.

हा मसुदा GSR अधिसूचना मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने याआधीच एक जुलै 2019 पासून चालक एअरबॅग आणि 01 जानेवारी 2022 पासून चालकासमोरील सह-प्रवासी एअरबॅगच्या फिटिंगची अंमलबजावणी अनिवार्य केली होती.

पुढील आणि मागील दोन्ही कंपार्टमेंटमध्ये बसलेल्या रहिवाशांना पुढील आणि बाजूकडील टक्करांचा प्रभाव कमी करण्यासाठी, M1 वाहन श्रेणीमध्ये 4 अतिरिक्त एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील वाहनांना पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित बनवण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.असे गडकरी म्हणाले.

You might also like