6 कोटी ते क्लास-1 नोकरी; ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रावर देशभरातून बक्षिसांचा वर्षाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टोकियो ओलीम्पिक स्पर्धेत भालाफेक मध्ये भारतीय खेळाडू नीरज चोप्राने इतिहास रचत सुवर्णपदक मिळवले. यंदाच्या ओलीम्पिक मधील भारताला मिळालेल हे पहिले सुवर्णपदक मिळाले. नीरजने तब्बल 87.58 मीटर लांब भाला फेकत इतिहास रचला. यानंतर देशभरातून नीरजचे कौतुक होत असून बक्षिसांचा वर्षाव होत आहे. हरियाणा सरकारने नीरज चोप्राला हरियाणा सरकारच्या पॉलिसीनुसार 6 कोटी रुपये आणि क्लास-1 नोकरी दिली जाईल.

तसेच खेळाडूंसाठी आम्ही पंचकुलामध्ये कौशल्य केंद्र उभारत आहोत, या केंद्रावर आम्ही नीरज चोप्राची इच्छा असेल तर त्याला प्रमुख म्हणून नियुक्त करू. तसंच त्याला इतर खेळाडूंप्रमाणेच 50 टक्के सवलतीमध्ये जमीन विकत घेता येईल,’ अशी घोषणा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केली.

दरम्यान, पंजाब सरकारकडून देखील नीरज चोप्राला दोन कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. सोबतच बीसीसीआयने देखील नीरजचं कौतुक करत एक कोटी रुपयांचं बक्षीस दिलं आहे तर आयपीएल फ्रंचायजी चेन्नईनं देखील एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी नीरज चोप्राला नवीन लॉन्च होत असलेली एसयूवी 700 गिफ्ट करणार असल्याचं म्हटलं आहे.

Leave a Comment