लाॅकडाउन दरम्यान घर‍ात घुसला ६ फुट लांब कोबरा; नंतर…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुमारे सहा फूट उंच किंग कोब्रा नागाने घरात प्रवेश करताच राजस्थानची राजधानी जयपूरमधील एक कुटुंबामध्ये गुरुवारी घबराट पसरली.वनविभागाची टीम घटनास्थळी आली आणि सुमारे चार तासांच्या अथक परिश्रमानंतर कोब्राला पकडण्यात त्यांना यश आले.त्यानंतर या कुटुंबाने सुटकेचा श्वास घेतला.या बचावा दरम्यान कोब्रा नागाने वनविभागाच्या पथकावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला.

मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरच्या केसीसी नगरातील विजय शर्मा यांच्या घरी सकाळी ६ वाजता जेव्हा कुटुंब जागे झाले तेव्हा त्यांना घरात कोब्रा फिरत आल्याचे लक्षात आले.कुटुंबातील लोक त्यामुळे घाबरून गेले,कारण लॉकडाऊनमुळे जवळपासच्या कोणालाही मदतीसाठी त्यांना हाक मारता येत नव्हती आणि कोब्रा असताना ते घरात राहू शकत नव्हते.

दरम्यान कोब्रा घरातच राहिला आणि सगळीकडे फिरला.नंतर विजय शर्मा यांनी वनविभागाला याची माहिती दिली.त्यानंतर जयपूरमधील विषारी सजीवांच्या बचावासाठी असलेल्या विभागाने होप अँड बियॉन्ड यांच्या टीममध्ये खास तज्ञ असलेले जॉय गार्डनर आणि अभिषेक सिंग या डॉक्टरांना तिथे पाठवले. जवळपास चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर ते घटनास्थळी पोहोचले आणि कोब्राला पकडले.या बचावा दरम्यान कोब्राने अनेकदा बचाव पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला.

जॉय गार्डनरने सांगितले की,कोब्रा हा भारतातील सर्वात विषारी सापांपैकी एक आहे.जर एखाद्यास हा कोब्रा चावल्यास आणि लवकर उपचार न मिळाल्यास अर्ध्या तासात त्याचा मृत्यू होणे निश्चित आहे.सध्या हा कोब्रा पकडला गेला आहे आणि त्याला जंगलात सुरक्षितपणे सोडन दिले आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment