दिवसाढवळ्या दुकानदारावर गोळीबार, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

0
71
Firing
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशामध्ये सध्या कोरोना परिस्थिती हळूहळू आटोक्यात होत आहे. सर्वसामान्य जीवन पूर्वपदावर येत आहे काही राज्यांमध्ये अनलॉक ची प्रक्रिया सुरू असून दुकाने उघडण्यात आली आहेत.मात्र राजस्थानातल्या एका दुकानाबाहेर चक्क गोळीबार झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हा थरारक व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहे व्हिडीओ ?

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, राजस्थानातील एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सहा जणांनी दिवसाढवळ्या गोळीबार केल्याचे पाहायला मिळाले. ही थरारक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. दोन दुचाकीवर आलेले सहा युवक आधी गोळीबार करतात आणि नंतर आपापल्या गाडीवर बसून तिथून निघून जातात. एका गाडीवर तिघेजण बसल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.हे व्यक्ती एका भाजीपाला आणि फळांच्या दुकानदारावर हा गोळीबार करतात मात्र सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. गोळीबार झाला तेव्हा हा दुकानदारही दुकानाच्या आतच होता.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की ‘या सीसीटीव्ही फुटेज चा तपास सुरू आहे. गोळीबार करणाऱ्या युवकांचा शोध घेण्याचे काम सध्या सुरू आहे असं पोलिसांनी सांगितलं. ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला त्याचं नाव कैलास मीना असल्याचं समोर आलं आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता तीन हल्लेखोर मीना यांच्या दुकाना बाहेर आले त्यांनी त्यांना हाक मारली यानंतर मीना बाहेर आले याच दरम्यान युवकांनी त्यांच्यावर गोळीबार करायला सुरुवात केली. मात्र ते या घटनेतून बचावले. बराच वेळ गोळीबार करूनही कैलास मीना बचावले असल्याचे पाहताच सगळे हल्लेखोर आपल्या गाड्यांवर बसून फरार झाले. कैलास मीना हे फळ आणि भाजीपाला तसेच धान्याची कमिशन एजंट म्हणून खरेदी-विक्री करतात.

याबाबत कैलास मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे कोणताही व्यक्ती सोबत भांडण किंवा वैर नाही इतकच नाही तर गोळीबार केलेल्यांपैकी कोणत्याच व्यक्तीला आपण ओळखत नसल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे मात्र अद्याप या हल्ल्याचा उद्देश आणि नेमकं कारण काय आहे हे समोर आलेले नाही मात्र हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here