विद्यार्थ्यांना दर वर्षाला मिळणार 60 हजार रुपये, ‘ही’ आहे नवी योजना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल शिक्षणाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. गावाकडून आलेल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शहरात जाऊन शिकणे खूप अवघड होऊन जाते. कारण शिक्षणासाठी लागणारा खर्च, वस्तीगृहाचा खर्च, जेवणाचा खर्च, राहण्याचा खर्च या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते. परंतु अशा गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षण करता यावे. आणि त्यांच्या आयुष्यात भरभराट करता यावी. यासाठी सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत होते.

अशातच आता उच्च शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी भाड्याने खोली घेण्यासाठी आणि जेवणासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना ओबीसी कल्याण विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी दरवर्षाला 60 हजार रुपये दिले जातात.

विद्यार्थ्यांना मिळणार 60 हजार रुपये

ओबीसी कल्याण विभागाच्या माध्यमातून ही पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दरवर्षाला 60 हजार रुपये पर्यंत रक्कम दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी राहून शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना दरवर्षाला भोजन भत्ता 32 हजार रुपये आणि निवासी भत्ता 20 हजार रुपये दिले जाणार आहेत. आणि निर्वाह भत्ता 8000 रुपये असे 60 हजार रुपये दिले जाणार आहेत.

जर विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेत असतील, तर त्यांना भोजन भत्ता म्हणून 23 हजार रुपये निवासी भट्ट 10 हजार रुपये आणि निर्वाह भत्ता पण 5000 रुपये 38 हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील 600विद्यार्थ्यांना दरवर्षी लाभ मिळतो. त्याचप्रमाणे 21000 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये 60% गुण आहे त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी ही रक्कम दिली जाते. ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.