३ महिन्यात ६१० शेतकरी आत्महत्या ; सहकार मंत्र्यांची विधानसभेत माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | जानेवारी ते मार्च २०१९ या तीन महिन्याच्या कालखंडात ६१० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे अशी माहिती सहकार आणि मदत , पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. ते विधान सभेत बोलत होते. ६१० शेतकरी आत्महत्या प्रकरणातील १९२ प्रकरणे समितीने मदतीस पात्र ठरवली आहेत. तर १८२ प्रकरणात मदत देण्यात आली आहे. ९६ प्रकरणे निकषात बसत नसल्याने बाद ठरली आहेत. तसेच ३२३ प्रकरणे समितीसमोर प्रलंबित असल्याची माहिती सुभाष देशमुख यांनी विधान सभेला दिली आहे.

२०१५-१८ या काळात एकूण १२०२१ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे निदर्शनास आली आहेत. यापैकी ६८८८ प्रकरणे निकषात असल्याने पात्र ठरवण्यात आलेली आहेत. यापैकी ६८४५ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना एक लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकरी स्वावलंबी मिशन आणि सन्मान योजना राबवली. असे असतानाही गेल्या ४ वर्षांत शेतीमालाला हमीभाव मिळाला नाही, बोंडअळी प्रादुर्भावामुळे बाधित शेतकरी वर्ग, कर्जबाजारीपणा आणि दुष्काळामुळे १२ हजार शेतकऱयांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे.

मराठवाडय़ातील औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, बीड, हिंगोली, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात ४ हजार १२४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी एकट्या नांदेड जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ९४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर केवळ ३४ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत मिळाली. तर ८ प्रकरणे अद्यापी प्रलंबित आहेत.

Leave a Comment