आजीसमोर सारा अली खान पण फिक्की; चकाचक गाण्यावर लगावले जबरदस्त ठुमके

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या सोशल मीडियावर सारा अली खानचं चकाचक गाणे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या गाण्याने सर्वांना वेड लावले आहे. या गाण्यावर अनेकजण सोशल मीडियावर डान्स करताना दिसत आहे. अशाच एका व्हिडीओत एका आजीबाईने या गाण्यावर डान्स केला आहे. 63 वर्षांच्या रवी बाला ज्या डान्सिंग दादी म्हणूनही प्रसिद्ध आहेत.

सोशल मीडियावर त्यांचे डान्सचे बरेच व्हिडीओ आहेत. नव्या – जुन्या सर्व गाण्यांवर त्या डान्स करताना दिसतात. नुकतंच सारा अली खानचे चकाचक रिलीज झाले. या गाण्यावरही रवी बाला या डान्सिंग आजीने जोरदार ठुमके लगावले आहेत. या आजीचा उत्साह आणि जोश पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल.

https://www.instagram.com/reel/CXYTL9aLKXK/?utm_source=ig_embed&ig_rid=85056a09-8d3f-4e6c-baa1-1db7599eaf06

या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता गाण्यात सारा जशी हिरव्या रंगाची साडी नेसली आहे, अगदी तशीच साडी आजीही नेसली आहे आणि सारा जशा या गाण्यावर स्टेप्स करताना दिसते, अगदी तशाच स्टेप्स या आजी करताना दिसत आहेत. आजी आणि साराचा डान्स पाहिला तर वयाच्या मानाने आजी कितीतरी पटीने सारापेक्षा चांगला डान्स करत आहेत. या आजीच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

Leave a Comment