धक्कादायक! मुंबईतील उच्चभ्रू मंत्रालयातील खास पत्राच्या मदतीने पाचगणीत, २३ जणांवर कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाचगणी प्रतिनीधी |  कोरोना विषाणुने सध्या जगभर थैमान घातले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६७१७ वर पोहोचला आहे. तर महाराष्ट्रात आत्तापर्यंत १२९७ कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशात सर्वाधिक कोरोनारुग्ण महाराष्ट्रात असून राज्यात मुंबईत सर्वात जास्त रुग्ण सापडले आहेत. मुंबईतील कोरोनारुग्णांची संख्या आता ८५७ वर पोहोचली आहे. यापार्श्वभुमीवर राज्यात सर्वत्र लाॅकडाउन असताना मुंबईतील काहि उच्चभ्रू मंत्रालयातील खास पत्राच्या मदतीने जिल्हाबंदी तोडून सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथे पोहोचले आहेत. पाचगणीत जिल्ह्याबाहेरुन आलेल्या या २३ जणांना संस्थात्मक विलगीकरणाकरीता दाखल करण्यात आले असल्याची माहीती समोर आली आहे.

जिल्हाअधिकारी सातारा यांनी जिल्ह्याबाहेरील व्यक्तींना व ज्यांची मालमत्ता नाही अशांना २३ मार्च रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत पाचगणी व महाबळेश्वर सोडण्याचे आदेश दिले होते.  मात्र असे असताना देखील मुंबईवरुन आलेल्या सदर जिल्ह्याबाहेरील व्यक्तींना संस्थामत्क विलगीकरणाकरीता पाचगणीतच ठेवण्यात आल्याने  प्रशासनाच्या निर्णयाने पाचगणी व महाबळेश्वरमध्ये खळबळ उडाली आहे.

संस्थात्मक विलगीकरणात दाखल करण्यात आलेल्या २३ व्यक्ती या उत्तम असुन त्यांना खबरदारी म्हणुन संस्थात्मक विलगीकरणात दाखल करण्यात आले असल्याची माहीती समोर येत आहे. जिल्ह्याबाहेरील धनदाडग्याने व त्याच्यासमवेत काल २३ जणानी महाबळेश्वरच्या हद्दीमद्ये प्रवेश केला. मात्र स्थानिक महाबळेश्वर नगरपालीकेच्या हद्दीमध्ये असलेल्या मालमत्तेत येवुन राहील्यानंतर लगेचच नगरपालीकेच्या अधिकारी व टीम यांनी संबंधित जिल्हाबाहेरील व्यक्तीला होम क्वारटाईन न करता प्रशासनाने संबंधित जिल्हाबाहेरील धनदाडग्यासह २३ जणांना पाचगणीत संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल केले.

दरम्यान जिल्हाअधिकारी सातारा यांनी याअगोदर पाचगणी व महाबळेश्वर येथून जिल्हाबाहेरील व्यक्तिंना महाबळेश्वर पाचगणी सोडुन जाण्याचे आदेश दिले असताना जिल्ह्याबाहेरील धनदाडग्यांना जिल्ह्यात प्रवेश देण्यातच कसा आला? त्याला कोणाच्या आदेशाने जिल्ह्यांमध्ये परवानगी देण्यात आली ? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.