सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र सातारकरांची एक दिलासादायक बातमी आहे. जिल्ह्यात कोरोनावर मात करून कोरोना आजारातून ठणठणीत होऊन घरी परतणाऱ्यांचा आकडा वाढत आहे. आज जिल्ह्यातील एकूण चार कोरोना बाधित रुग्णांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते बरे झाले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली आहे.
आज डिस्चार्ज मिळालेल्या कोरोना रुग्णांमध्ये कराड येथील कृष्णा हॉस्पिटल मधील ४ तर सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील ३ कोरोनाग्रस्तांचा समावेश आहे. यामध्ये कराड तालुक्यातील मलकापूर येथील 37 वर्षीय पुरुष, त्याची 2 वर्षीय मुलगी, आगाशिवनगर येथील 68 वर्षीय पुरुष आणि खोडशी येथील 68 वर्षीय पुरुष आदींचा समावेश आहे. हॉस्पीटल स्टाफने टाळ्यांच्या गजरात या रुग्णांना डिस्चार्ज दिला असून ते आता कोरोनमुक्त झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. कृष्ण हॉस्पिटल येथील चार जणांचे 14 दिवसांनंतरचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आलेने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.
दरम्यान, जिल्ह्यातून आत्तापर्यंत कराडमधुन ७३ जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कराड तालुक्यात आजपर्यंत एकूण ५९ कोरोनाग्रस्तांनी कोरोनावर मात केली आहे. यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. रोहिणी बाबर, डॉ. संजय पाटील, डॉ. व्ही. सी. पाटील, कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्यासह अन्य स्टाफ उपस्थित होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”