परळी आणि बारामतीत पशुवैद्यक महाविद्यालये उभारण्यास मंजूरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

0
3
cabinet meeting
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ज्यात परळी आणि बारामतीत पशुवैद्यक महाविद्यालये उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, इतरही अनेक मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

१) पौड, ता. मुळशी, जिल्हा पुणे येथे लिंक कोर्टऐवजी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या न्यायालयाची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

२) ठाणे जनता सहकारी बँकेत सार्वजनिक उपक्रम, महामंडळे यांना खाते उघडण्यासाठी परवानगी मिळाली आहे.

३) 1976 पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रलंबित कामांचा कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय; अशा 332 गावठाणासाठी 599.75 कोटी रुपयांच्या तरतुदीस मंजुरी
देण्यात आली आहे.

४) महाराष्ट्र राज्य आधारसामग्री (डेटा) धोरणास मान्यता; राज्य डेटा प्राधिकरण स्थापन करणार आहे. त्यानंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियामक समिती गठीत केली जाईल.

५) बारामती जिल्हा पुणे येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी 564.58 कोटी रुपयांच्या तरतूदीस मंजुरी मिळाली आहे.

६) परळी, जिल्हा बीड येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी मिळाली आहे. यासाठी 564.58 कोटी रुपयांच्या तरतूदीस मंजुरी मिळाली आहे.

७) महाराष्ट्र महामार्ग अधिनियम कलम 18(3) 1955 मध्ये सुधारणा, तसेच महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश 2025 ला मान्यता देण्यात आली आहे. हे सर्व निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले आहेत.