COVID-19 वरील लस बनवण्याच्या शर्यतीत आहेत ‘या’ ७ भारतीय फार्मा कंपन्या; आघाडीवर कोण आहे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसची लस तयार करण्यात सात भारतीय औषध कंपन्यांचा सहभाग आहे. भारत बायोटेक (Bharat Biotech), सीरम इंस्टिट्यूट (Serum Institute of India), जायडस कॅडिला (Zydus Cadila), पॅनेसिया बायोटेक (Panacea Biotec), इंडियन इम्यूनोलॉजिकस (Indian Immunologicals), मायनवॅक्स (Mynvax) आणि बायोलॉजिकल ई (Biological E) या कोविड -१९ वरची लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, ही लस तयार करण्यासाठी बर्‍याच वर्षांच्या चाचणीची आवश्यकता असते आणि त्यानंतर त्याच्या उत्पादनासाठी अतिरिक्त कालावधीही लागत असतो. मात्र साथीच्या या रोगामुळे शास्त्रज्ञ काही महिन्यांतच वरील लस तयार करण्याची अपेक्षा करीत आहेत.

जगभरात या प्राणघातक साथीचा फैलाव रोखण्यासाठी लस बनविण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. आतापर्यंत, जगभरात 14 दशलक्ष लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. आतापर्यंत या साथीने जगभरात 6 लाखाहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे.

Covaxin- भारत बायोटेकला वॅक्सीन कँडिडेट कोवॅक्सीन (Covaxin) च्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांसाठी मान्यता देण्यात आली आहे. हे कंपनीच्या हैदराबाद येथील कारखान्यात तयार केले जाईल. कंपनीने गेल्या आठवड्यातच याच्या मानवी क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या आहेत. हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीने रोहतकच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे गेल्या आठवड्यात आपली लस कोवॅक्सीनची मानवी चाचणी सुरू केली. सार्स -कोव्ह -2 वॅक्सीनच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांसाठी भारतीय औषध नियामकांकडून मान्यता मिळाली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) यांच्या संयुक्त विद्यमाने कंपनीने ही लस विकसित केली.

AstraZeneca- सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या आणखी एका कंपनीला कोविड -१९ वरील वॅक्सीन या वर्षाच्या अखेरीस तयार होण्याची अपेक्षा आहे. सीरम संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीई) अदार पूनावाला म्हणाले, “आम्ही सध्या अ‍ॅस्ट्रॅजेनेका ऑक्सफर्ड वॅक्सीनवर काम करीत आहोत, ज्याची तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी सुरू आहे. ऑगस्ट 2020 मध्ये आम्ही भारतात याच्या मानवी चाचण्या सुरू करणार आहोत. आतापर्यंत क्लिनिकल चाचण्यांविषयी उपलब्ध माहितीच्या आधारे, आम्हाला आशा आहे की अ‍ॅस्ट्रॅजेनेका ऑक्सफोर्ड वॅक्सीन या वर्षाच्या अखेरीस उपलब्ध होईल.

ZyCoV-D- दरम्यान, जायडस कॅडिला नावाची आणखी एक फार्मा क्षेत्रातील कंपनी म्हणाली की, कोविड -१९ च्या वॅक्सीन कँडिडेट झिकोव्ह-डी (झेकोओव्ही-डी) च्या क्लीनिकल चाचण्या येत्या सात महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. अध्यक्ष पंकज आर पटेल यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “अभ्यासाच्या निकालानंतर डेटा उत्साहवर्धक राहिल्यास आणि ही लस चाचणीच्या काळात प्रभावी असल्याचे सिद्ध झाल्यास, चाचणी पूर्ण करण्यास आणि वॅक्सीन तयार करण्यास सात महिने लागतील.”

पॅनेसिया बायोटेकने जूनमध्ये म्हटले आहे की, कोविड -१९ ची वॅक्सिन विकसित करण्यासाठी ते अमेरिकेच्या रेफेनासमवेत आयर्लंडमध्ये एक संयुक्त उपक्रम राबवित आहे. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाची (एनडीडीबी) उपकंपनी असणारी इंडियन इम्युनोलॉजिकलने कोरोना व्हायरसची वॅक्सिन विकसित करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या ग्रिफिथ विद्यापीठाशी करार केला आहे. याशिवाय कोविड -१९ ची लस तयार करण्याचे काम मायनवॅक्स आणि बायोलॉजिकल ई देखील करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment