Sunday, May 28, 2023

‘या’ बँकांच्या बचत खात्यावर मिळते आहे 7% व्याज, जाणून घ्या कोणती बँक जास्त फायदेशीर आहे

नवी दिल्ली । या कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात जिथे अनेक मोठ्या बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट (fixed deposits – FD) तसेच बचत खात्याचे व्याज दर निश्चित असतात. तेथे खासगी क्षेत्रातील आयडीएफसी फर्स्ट बँक बचत खात्यावर 7% व्याज देत आहे. अनेक लहान बँका आपल्या बचत खात्यावर 6 टक्क्यांहून अधिक व्याज देत आहेत. काही बँका 7 टक्के व्याज दर देत आहेत. बचत खात्यात किमान शिल्लक राखणे महत्वाचे आहे. जर आपण ते राखण्यास अक्षम असाल तर आपल्याला दंड भरावा लागेल.

IDFC First Bank : आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या बचत खात्यावर 1 लाख रुपयांच्या डिपॉझिटसवर 7 टक्के व्याज देत आहे. हे व्याज दर 1 जानेवारी 2021 पासून लागू आहेत. पूर्वी ते 6 टक्के व्याज दर देत होते.

Bandhan Bank : बंधन बँक आपल्या बचत खात्यावर 6% पर्यंत व्याज देत आहे.

IndusInd Bank : इंडसइंड बँक 1 लाखांच्या डिपॉझिटसवर 4 टक्के व्याज देत आहे. एक लाख ते दहा लाख रुपयांच्या थकबाकीवर बँक बचत खात्यावर 5 टक्के व्याज देत आहे. तर 10 लाखांच्या वरच्या रकमेवर 6 टक्के व्याज देत आहे.

Utkarsh Small Finance Bank : उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आपल्या बचत खात्यावर 25 लाखांपर्यंतच्या रकमेवर 7.25 टक्के व्याज देत आहे. हे दर 1 ऑगस्ट 2020 पासून लागू आहेत. 1 लाख रुपयांच्या थकबाकीवर बँक 5 टक्के व्याज देत आहे. 1 लाख ते 25 रुपयांच्या थकबाकीवर बँक 6 टक्के आणि 25 लाखांच्या वरच्या रकमेवर 7.25 टक्के व्याज देत आहे.

AU Small Finance Bank : एयू स्मॉल फायनान्स बँक आपल्या बचत खात्यावर 1 लाख रुपयांपेक्षा कमी रकमेवर 4% व्याज मिळणार आहे. बँक 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आणि 5 लाखांपेक्षा कमी दराने 5 टक्के व्याज देत आहे. तसेच 5 लाख ते 10 लाख रुपयांपेक्षा कमी रकमेवर 6 टक्के व्याज दिले जाते. त्याचबरोबर 10 लाख ते 5 कोटी रुपयांच्या थकबाकीवर बँक 7 टक्के व्याज देत आहे.

हे सर्व व्याज दर सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) , बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda), एचडीएफसी बँक (HDFC Bank), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank) या खाजगी क्षेत्रातील बँकांपेक्षा जास्त आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.