हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाकिस्तान विरोधातील मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेआधीच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. संघातील तब्बल 7 सदस्यांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये तीन खेळाडू व व्यवस्थापकीय टीममधील चार सदस्यांचा समावेश आहे.
इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डानं ( ECB) याबाबतचे अधिकृत प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या सदस्यांना लंडन सरकारच्या नियमानुसार विलगिकरणात जावे लागणार आहे. इतर सदस्यही विलगिकरणात असणार आहे.
The ECB can confirm that seven members of the England Men's ODI party have tested positive for COVID-19.
— England Cricket (@englandcricket) July 6, 2021
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात 8 जुलैपासून सामन्यांना सुरुवात होणार आहे. 8 जुलैला पहिला एकदिवसीय सामन्यानंतर 10 जुलैला दुसरा आणि 13 जुलैला तिसरा सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर टी-20 मालिका 16 जुलैपासून सुरु होणार आहे. 16 जुलै, 18 जुलै आणि 20 जुलैला टी-20 सामने खेळवले जाणार आहेत.




