सध्या राज्यामध्ये राजकीय वातावरण तापले असून कोणत्याही क्षणी विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच राज्यपाल नियुक्त सात आमदारांनी आपल्या पदाची शपथ घेतली आहे. बारा पैकी सात आमदारांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. आज दुपारी बारा वाजता विधिमंडळात उपसभापती नीलम गोरे यांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी पार पडला. सात आमदारांमध्ये कोणाची नाव आहेत चला जाणून घेऊयात…
राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी सात आमदारांची नावे पाठवण्यात आली होती. त्यानंतर या सात आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला यामध्ये भाजपला तीन, शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन जागा देण्यात आले आहेत.
भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या पोहरादेवी संस्थांचे बाबुसिंग महाराज राठोड यांना भाजपन संमती दिली आहे. शिवसेनेकडून माझी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांना विधान परिषदेवर पाठवण्यात येत आहे. तर राष्ट्रवादीकडून पंकजा भुजबळ आणि इंद्रिष नायकवडी यांना विधान परिषदेचे आमदारकी देण्यात आली आहे.
राज्यपाल नियुक्त आमदारांची नावे पुढीलप्रमाणे
- इद्रिस नायकवडी (अजित पवार गट)
- चित्रा वाघ (भाजप)
- विक्रांत पाटील (भाजप)
- मनीषा कायंदे (शिंदे गट)
- बाबूसिंग महाराज राठोड (भाजप)
- हेमंत पाटील (शिंदे गट)
- पंकज भुजबळ (अजित पवार गट)