कोरोनाने नाही व्यसनाने घेतला जीव ! दारू मिळेना म्हणून सॅनिटायझर पिवून भागवली तलप , 7 जणांचा मृत्यू

0
114
death
death
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : व्यसन कोणतेही असतो ते नेहमी वाईटच असते. सध्या सर्वत्र कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. राज्यातही कोरोनाला थोपवण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे तळीरामांची मात्र चांगलीच पंचाईत झाली आहे. मात्र व्यसनाधीन पणा किती जिवावर बेतू शकतो याचं उदाहरण यवतमाळ मधून पुढे आले आहे. यवतमाळ मधील काही लोकांनी गावात दारू मिळत नसल्यानं चक्क सॅनिटायझर प्राशन केलं आणि त्यामुळे सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सॅनिटायझर मध्ये अल्कोहोल असते हे सर्वांनाच ऐकून माहिती असेल. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील वणी या शहरातील दारूचे सर्व अड्डे पालथे घातल्यानंतरही दारू मिळत नसल्याने तेथील काही लोकांनी दारूची नशा पूर्ण करण्यासाठी सॅनिटायझर प्राशन केले. सॅनिटायझर पिल्याने एका शहरातील सात जणांचा मृत्यू झाला आहे.

वणी शहरातील तेली फैल भागात राहणाऱ्या दत्ता लांजेवार आणि नूतन पथरकर यांनी दोघांनीही काल दारूची नशा भागवण्यासाठी सॅनिटायझर प्यायले होते त्यानंतर ते दोघेही आपापल्या घरी गेले पण कालांतरानं रात्री उशिरा दोघांच्याही छातीत दुखायला सुरू झाले. त्यांना होणारा त्रास पाहता नातेवाईकांनी त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केलं रुग्णालयात उपचार सुरू असतानाच दोघांनी डिस्चार्ज मागून घेतला आणि दोघेही घरी आले. पण मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना छातीत पुन्हा वेदना सुरू झाल्या दरम्यान काही मिनिटातच दोघांचा मृत्यू झाला.

वणी शहरातीलच दुसऱ्या एका घटनेत एकता नगर येथील रहिवासी असणारे संतोष मेहेर, गणेश नांदेकर, सुनील धेंगले, गणेश शेलार आणि अन्य एका व्यक्तीने सुद्धा दारू ऐवजी सॅनिटायझर प्राशन केलं होतं या सर्वांचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. या सर्वांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेने मात्र परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here