महायुतीचा मास्टर स्ट्रोक! हे 7 मोठे प्रोजेक्ट महाराष्ट्रात सत्ता संतुलन राखणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात तब्बल 7 बड्या प्रकल्पांना महायुती सरकारने नुकताच ग्रीन सिग्नल दिला आहे… या प्रकल्पातून तब्बल 81, 000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून वीस हजारांहून अधिक रोजगार निर्मिती होणार असल्याचं सांगण्यात येतय… हे प्रकल्प नेमके काय आहेत? या प्रकल्पांनी महाराष्ट्राचं राजकारणाचं आणि विकासाचं सत्ता संतुलन नेमकं कसं राखलय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकल्पातून महायुती सरकारनं नेमकं काय साध्य केलं? तेच पाहुयात

सर्वात आधी समजून घेऊयात 7 प्रकल्प नेमके कोणते?

राज्यात ७ मोठ्या उद्योगांना महायुती सरकारने नुकतीच मंजूरी दिली. यात तब्बल ८१ हजार कोटी पेक्षा अधिक रुपयांची गुंतवणूक होणार असून २० हजारांहून अधिकची रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावाही सरकारकडून केला जातोय…राज्याच्या कोकण, मराठवाडा व विदर्भ या तीन विभागांमध्ये हे उद्योग उभे राहणार असून या विभागांमध्ये एकदाच एवढी मोठी गुंतवणूक त्यांचा औद्योगिक अनुशेष भरून काढायला मदत करेल. विशाल आणि अतिविशाल अशा सात प्रकल्पामध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारीत इलेक्ट्रिक व्हेइकल, सेमिकंडक्टर चिप्स, लिथियम बॅटरी, सोलार पी.व्ही. मॉडुल्स व इलेक्ट्रोलायझर, मदयार्क निर्मिती व फळांचा पल्प या प्रकलपांचा समावेश असल्याचं समजतंय…

Mahayuti चा मास्टर स्ट्रोक! हे 7 मोठे प्रोजेक्ट महाराष्ट्रात सत्ता संतुलन राखणार | Maharashtra News

आता पाहुयात विदर्भाच्या वाट्याला नेमकं काय येणार ते?

विदर्भातील नागपूर येथे जवळपास ३३००० कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रोजेक्टच्या माध्यमातून होण्याचा दावाय… यामध्ये आवाडा इलेक्ट्रो कंपनीचा सोलार पी. व्ही. मॉड्यूल्स व इलेक्ट्रोलायझरचा इंटिग्रेटेड प्रोजेक्ट सुरू होणारय. यामध्ये ७००० कोटी रुपयांची गुंतवणूक असेल… सोबतच लिथियम बॅटरी निर्मितीचा अतिविशाल प्रकल्प असून सुरू होणार असून यात तब्बल २५००० कोटी रुपये गुंतवणुकीतून ५ हजारांहून अधिकची रोजगार निर्मिती होणारय. तर परनॉर्ड रिकार्ड इंडिया लिमिटेड मार्फत डिस्टीलरीचा विशाल प्रकल्प बुटीबोरी येथे सुरू होणार असून यात १७८५ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचं समजतय… या सर्व उद्योग प्रकल्पातून विदर्भात जवळपास आठ हजारहून अधिक रोजगारांची निर्मिती होइल….

आता वेळ येते ते मराठवाड्याच्या वाट्याला काय? हे जाणून घेण्याची…

मराठवाड्यात या प्रकल्पातून तब्बल २७ हजार कोटी रुपयांची भरघोस गुंतवणूक होणार असल्याची माहिती मिळतेय… जे.एस.डब्लु. ग्रीन मोबईलीटी लि. कंपनी इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहन निर्मितीच्या उद्योगात छ. संभाजी नगर येथे २७ हजार कोटी एवढी गुंतवणूक करणार आहे यातून ५२०० पेक्षा अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. एवढी मोठी गुंतवणूक असलेला हा राज्यातील पहिलाच अतिविशाल प्रकल्प आहे. या प्रकल्पात वर्षाला ५ लाख इलेक्ट्रिक प्रवासी वाहने आणि १ लाख व्यावसाईक वाहनांची निर्मिती होणार असल्याचं सांगण्यात येतंय…

यासोबतच कोकण आणि मुंबई विभागात ( Only For Text – कोकण आणि मुंबईच्या वाट्याला काय? ) जवळपास २१००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. आर. आर. पी. इलेक्ट्रॉनिक्स कंपनी मार्फत सेमी कंडक्टर चिप्सचा इंटिग्रेटेड प्रोजेक्ट तळोजा किंवा पनवेल मध्ये उभारला जाण्याची शक्यता आहे. सेमी कंडक्टर चिप्स निर्मितीचा हा महाराष्ट्रातील त्यामुळे पहिलाच प्रकल्प होऊ शकतो… यामध्ये दोन टप्यात प्रत्येकी १२००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर महापे, नवी मुंबई येथे प्रकल्पाचे काम सुरू देखील करण्यात आलंय… रोजगार निर्मितीसाठीही या प्रकल्पांची मोठी मदत होणारय… फळ प्रक्रिया उद्योगांची मागणी कोकणातून नेहमीच होत असते.. म्हणूनच हिंदुस्तान कोका कोला बेव्हरेज मार्फत फळांचा पल्प आणि रस यावर आधारित प्रकल्प कोकणातील रत्नागिरी मध्ये सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय… १५०० कोटी रुपये एवढी गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पामुळे फळबाग शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होणार असून स्थानिकांना रोजगार देखील मिळणार आहे…

थोडक्यात काय एकाच वेळी शेतकरी, महिला सक्षमीकरण आणि औद्योगिक आघाड्यांवर महायुती सरकार घोडदौड करतय. यातून शेतकरी, बेरोजगार तरुण, पुरुष, महिला अशा लार्ज स्केलवर विकास करण्यावर सध्या सरकार भर देतय…बाकी या मोठ्या गुंतवणुकीची प्रत्यक्ष ग्राउंडवरची अंमलबजावणी कशी आणि कधीपर्यंत अस्तित्वातील येईल? हे पाहणं महत्त्वाचे ठरेल… या गुंतवणुकीबद्दल, आणि दारावर येऊन पोहोचलेल्या मोठ्या प्रकल्पांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.