सांगली | सर्पदंशामुळे सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना सांगली येथे घडली. परिसरात स्वच्छता केली जात नसल्यानेच ही घटना घडल्याचा आरोप चिमुकल्याच्या नातेवाईकांनी केला आहे.
सांगलीतील विश्रामबाग येथे महावितरणच्या कर्मचाऱ्यांची वसाहत असून वसाहतीतील केदार चव्हाण (वय ७ वर्षे) या मुलाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. वसाहतीत स्वच्छता केली जात नसल्याने परिसरातील सापांचा वावर वाढल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संतप्त नातेवाईकांनी शुक्रवारी सकाळी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना जाब विचारला.