Tuesday, June 6, 2023

ऊसाच्या फडामध्ये अंगावर ट्रक गेल्याने सात वर्षाची बालिका ठार  

पुसेसावळी : चोराडे ता. खटाव येथे ऊसाच्या फडामध्ये अंगावर ट्रक जावुन सात वर्षाच्या बालिका गंभीर जखमी होवुन जागेवर ठार झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेची नोंद अौंध पोलीस ठाणेत गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चोराडे येथील गाउंधर नावचे शिवारातील पांडुरंग निवृत्ती घुटुगडे यांच्या शेतात ऊस तोडणी सुरु होती. मंगळवारी दुपारच्या वेळी वाहनचालक दत्तात्रय अस्राजी भवर रा. कोहिनी ता. आष्टी जि. बीड, ट्रक क्रंमाक एम.एच १६ क्यु. २७४५ शेतात तोडलेला ऊस भरुन घेवुन जाणेसाठी गेला असता सदर अपघात झाला.

ट्रक मागे घेत असताना नेहा अजिनाथ गायकवाउ (वय ७ वर्षे) रा. मेखरी ता. आष्टी जि.बीउ सध्या रा.चोराडे हिचा ट्रकचे मागील चाक अंगावरुन जाऊन जागीच मृत्यू झाला. याबाबत वडील अजिनाथ गायकवाड यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

दरम्यान, ड्राईव्हरच्या निष्काळजीपणाने माझी मुलगी नेहा हिच्या अंगावरुन ट्रकचे पाठीमागील डाव्या बाजुकडील चाक गेल्याचा आरोप मृत मुलीच्या वडीलांनी केला आहे. नेहा हि गंभीर जखमी होवुन मयत झाली असल्याची फिर्याद गायकवाड वय ४० वर्ष मुळ रा. मेखरी ता. आष्टी जि.बीड, सध्या रा. चोराडे ता.खटाव जि.सातारा यांनी दिली अौंध पोलीस ठाण्यात दिली आहे. तरी पुढील तपास आर.एस.वाघ पो हवालदार करीत आहेत.