औरंगाबाद | कोरोना संसर्गाचा कहर ओसरत असताना शहरात म्युकरमायकोसिस या आजाराचा फैलाव झपाट्याने होत आहे. शुक्रवारी नवे ३० रुग्ण दाखल झाल्याने एकून रुगणसंख्या ३४४ वर पोहचली तर आणखी तीन रुगणांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ७० झाली आहे.
शहरात म्युकरमायकोसिस आजाराचा झपाट्याने फैलाव होत असल्याने आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाची झोप उडाली आहे. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासन स्तरावर नियोजन केले जात आहे. तरीही रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चिंताजनक म्हणजे, म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. बुधवारी सहा जणांचा तर गुरुवारी पाच जणांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी पुन्हा तीन जणांचा बळी गेल्याने मृत्युची संख्या ७० वर पोहचली आहे. अवघ्या तीन दिवसांत १४ जणांचा मृत्यू झाल्याने या आजाराची तीव्रता लक्षात येते. म्युकर मायकोसिसच्या आजाराचे शहरात रुग्ण कमी असले तरी ग्रामीण व बाहेरच्या जिल्हयांतुन हे रुग्ण शहरात उपचारासाठी दाखल होत आहे.
प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार म्युकरमायकोसिसमुळे शुक्रवारी घाटी रुग्णालयात एकाचा तर दोघांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. म्युकर मायकोसिस आजाराचे ३० रुग्ण दाखल झाले असून सक्रिय रुग्णांची संख्या ३४४ वर पोहचली आहे. यात मेडिकोव्हर हॉस्पिटल (१९) जिव्हाळा हॉस्पिटल (४) एशियन हॉस्पिटल (२१) अॅपेक्स हॉस्पिटल (१५) गजानन हॉस्पिटल (२) एम आयटी हॉस्पिटल ( ३९) एमीएम(६७) घाटी (८१) कमलनयन बजाज हॉस्पिटल (७)युनायटेड सिग्मा हॉस्पिटल (१८) डॉ. हेडगेवार रुग्णालय (४६) या अकरा रुग्णालयांतील रुग्णांचा समावेश आहे.