औरंगाबादेत एसआरपीएफ कॅम्पमध्ये खळबळ! 72 जवानांना कोरोनाची लागण

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद शहरात गुरुवारी कोरोना रुग्णांची संख्या 468 एवढी झाली आहे. एसआरपीएफ कॅम्पमधील 72 जवानांना कोरोनाची लागण zali असल्यामुळे जिल्ह्यात एकाच दिवसात 90 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

एसआरपीएफ कॅम्पमधील काही जवान हे मालेगांववरुन आले होते. त्यामुळे त्यांच्यात कोरोना सदृश्य लक्षण आढळून आल्याने घाटी रुग्णालयाची एक टीम त्यांची तपासणी करण्यासाठी गेली. तेव्हा येथील 72 जवानांना कोरोनाची लागण असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण पाहायला मिळत आहे. औरंगाबाद शहरातील विविध भागातील एकूण 90 रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या 468 झाली आहे. यातील 12 जणांचे मृत्यू झाले असुन 30 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

गुरुवारी सापडलेल्या रुग्णामध्ये एसआरपीएफ कॅम्प (72) जयभीम नगर (04), बेगमपुरा (04), भीमनगर, भावसिंगपुरा (01), शाह बाजार (01), ध्यान नगर, गारखेडा (01), एन-2 लघु वदन कॉलनी, मुकुंदवाडी (01), बायजीपुरा (03), कटकट गेट (01), सिकंदर पार्क (01) आहेत. तर ग्रामीण भागातील खुलताबाद (01) येथील आहेत. यामध्ये 83 पुरूष आणि सात महिला रुग्णांचा समावेश असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले.

You might also like