परदेशी नागरिकांकडे 75 एटीएम कार्ड : कराड, कोल्हापूरमधील अनेकांची ATM मधील रक्कम लंपास

कराड पोलिसांनी घेतले दोन रूमानीयाच्या नागरीकांना ताब्यात

कराड | बनावट एटीएम कार्डव्दारे नागरीकांच्या परस्पर त्यांच्या खात्यातून रक्कम लंपास काढणार्‍या दोन्ही परदेशी भामट्यांनी कोल्हापूरलाही एटीएम मधून रक्कम लंपास केल्याची कबुली त्यांनी कराड पोलिसांना दिली आहे. त्यामुळे कोल्हापूरातील प्रकार नक्की काय, याच्या तपासासाठी येथील पोलिस पथक कोल्हापूर जिल्ह्यात अधिक तपासाला रवाना झाले आहे. त्यांच्यासबोत दोन्ही संशयीतही आहेत. संशयीतांना कोल्हापूर भागातूनही पैसे काढल्याने त्या भागातील तपास या प्रकरणाला वेगळे वळण देणारा ठरणार आहे.

बनावट एटीएम कार्डव्दारे नागरीकांच्या खात्यातून परस्पर रक्कम काढून लुबाडणार्‍या दोन परेदशी नागरीकांना पोलिसांनी काल रंगेहात अटक केली. क्लोनव्दारे तयार केलले 75 बनावट एटीएम कार्ड जप्त केले असून 71 कार्ड चालू स्थितीत आहेत. त्या कार्डवर तब्बल 35 लाखांची रक्कम शिल्लक आहे. इस्फॅन लुस्टीन जुओर्गल (वय- 29) व लुनेट व्हसइल गॅबरिअल (वय- 28 दोघे रा. रूमानीया) अशी त्यांची नावे असून ते सध्या चार दिवसांची पोलीस कोठडीत आहेत. दोघेही रूमानीयाचे नागरीक आहेत. त्यांच्या पासपोर्टही नाही. तो दिल्ली पोलिसांनी जप्त केल्याची माहिती ते पोलिसांना देत आहेत. त्याची खात्री करण्याचे काम पोलिस करत आहेत. त्या दोघांनाही कोल्हापूर भागातही पैसे काढण्याचा उद्योग केल्याचे तपासात पुढे आले. त्यांनी कोल्हापूरलाही एटीएममधून रक्कम लंपास केली होती. त्याची खात्री करण्यासाठी पोलिस पथक त्या दोघा संशयीतांनाही घेवून कोल्हापूरला रवाना झाले आहे.

कोल्हापूरच्या काही सहकारी बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्याची त्यांनी कबुली दिली आहे. तेथे काही गुन्हे दाखल आहेत. त्याची तपासात तयार होणारी साखळी अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे कोल्हापूरातील माहिती या प्रकरणावर नव्याने प्रकाश टाकण्याची शक्यता आहे.