औरंगाबादेत सलग 75 तास पोहण्याचा उपक्रम ! इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – महानगरपालिकेतर्फे भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत सलग 75 तास पोहण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. औरंगाबाद शहरात उद्या 30 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थ जलतरण तलाव येथे महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या हस्ते सकाळी 9.00 वाजता या उपक्रमाचे उदघाटन होईल.

जलतरणपटूंच्या दोन टीम करणार विक्रम
औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ जलतरण तलाव येथे या उपक्रमाला सुरुवात होईल. यातील जलतरणपटूंमध्ये औरंगाबाद पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम हे एका संघाचे नेतृत्न करतील. तर विष्णू लोखंडे हे दुसऱ्या संघाचे नेतृत्व करणार आहेत. या दोन्ही संघात अनुक्रमे रुस्तुम घुगे, रामेश्वर सोनवणे, कदिर खान, एकनाथ मगर, वसंत पवार, सुदाम औताडे, गोपीनाथ खरात व राजेश भोसले या जलतरणपटू विक्रमवीरांचा समावेश आहे. या उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्येही होणार आहे.

भिंतीवरील रंगरंगोटीची पाहणी केली
आज बुधवारी, आयुक्त पाण्डेय यांनी सिडको जळगाव मुख्य रस्त्यापासून पायी चालत एन -१ सिडको येथील औरंगाबाद चिकलठाणा लायन्स क्लब नेत्र रुग्णालयाकडे जाणाऱ्या दोन्ही रस्त्याच्या बाजूने असलेल्या भिंतीवर होत असलेल्या रंगरंगोटी, पेंटिंग ,आजादी का अमृत महोत्सवा निमित्ताने रेखाटण्यात आलेल्या चित्राची पाहणी करून काही सूचना व मार्गदर्शन केले तसेच रुग्णालायाच्या बाजूला असलेल्या उद्यानाची व परिसराची पाहणी केली.

Leave a Comment