नवी दिल्ली | २०१६ या वर्षात एकुण ९,४७४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असून दररोज २६ विद्यार्थी आत्महत्या करत असल्याचं खा. अहिर यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेत सांगीतले होते. विद्यार्थी आत्महत्येचा आकडा या दहा वर्षांत ५२% वाढला असून रोज २६ विद्यार्थी आत्महत्या करत असल्याचं समोर आलं अाहे. २००७ ते २०१६ या नऊ वर्षांच्या कालावधीत एकुण ७५,००० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचं आकडेवारीवरुन समोर आले आहे.
आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांपैकी २३,००० म्हणजे २५% विद्यार्थ्यांनी परिक्षांमधील अपयशामुळे नैराश्यात जाऊन आत्महत्या केल्याचं समजत आहे. वाढती बेरोजगारी आणि त्यातून येणारे नैराश्य हे या तरुणांच्या आत्महत्यांचं कारण असल्यांचं बोलले जात आहे.
२०१२ साली प्रकाशित झालेल्या लान्सेट अहवालानुसार भारत हा तरुणांच्या (वय १५ ते २९) आत्महत्यांमधे जगात सर्वांत वरच्या स्थानावर आहे. महाराष्ट्रात २०१६ या वर्षात सर्वाधिक म्हणजे १,३५० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या असून त्याखालोखाल प. बंगाल (११४७ ) आणि तमिळनाडू (९८१ ) चा नंबर लागतो आहे.