नवी दिल्ली । देशात कोरोनाचा कहर सुरुच आहे. एव्हाना देशव्यापी लॉकडाऊनला ५० दिवस पूर्ण झाले आहेत. तरी कोरोनावर अजूनही नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढून आता 78 हजार 3 झाली आहे. त्यापैकी 49 हजार 219 लोकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचारानंतर पूर्णपणे निरोगी असलेल्या एकूण 26 हजार 235 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे. तर मृतांचा आकडा 2549 वर पोहोचला आहे.
मागील 24 तासांत 3 हजार 722 रुग्ण वाढले असून 134 जणांचा कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळतो आहे. देशात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 25 हजार 922 पर्यंत वाढली आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण लोकांची संख्याही 975 वर गेली आहे. तर ५५४७ जणांनी या विषाणूवर मात केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”