बाधित कमी : सातारा जिल्ह्यात 787 पॉझिटिव्ह तर 1 हजार 8 कोरोनामुक्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडकेे

सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 787 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 8 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 11 हजार 842 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 6.65 टक्के इतका आहे.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 10 हजार 85 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 3 हजार 213 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 89 हजार 59 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 4 हजार 888 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात 20 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासात रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह रेट कमी आला आहे. कराड तालुक्यात त्याचे प्रमाण जिल्ह्यात सर्वात जास्त असल्याचे गेल्या आठवडाभरात दिसून आले आहे. कराड तालुक्यात वाढणाऱ्या बाधितांमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढलेली पाहायला मिळत आहे.

Leave a Comment