7th Pay Commission : होळीआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार गोड बातमी !!! DA केली जाणार वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आली आहे. आता लवकरच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ होणार असल्याची आणि प्रलंबित DA ची थकबाकी दिली जाणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. यावेळी महागाई भत्त्यामध्ये 4 टक्क्यांची वाढ केली जाणार असल्याचे म्हटले जाते आहे. हे जाणून घ्या कि, 2022 मध्ये महागाई भत्त्यामध्ये 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. ज्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता 38 टक्के झाला आहे. आता यामध्ये आणखी 4 टक्क्यांची वाढ होऊन तो 42 टक्क्यांवर येईल. या वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ दिसून येईल.

7th Pay Commission: Big news! Salary will increase up to 40 thousand, will be announced today! know details - Business League

DA हाईक बाबत जाणून घ्या

कामगार मंत्रालयाकडून गेल्या महिन्यात नोव्हेंबरमधील AICPI इंडेक्सचे आकडे जारी करण्यात आले आहेत. फक्त डिसेंबरमधील आकड्यांसाठी थांबावे लागले होते, जे आता आले आहे. मात्र, पुढील DA मध्ये किती वाढ होणार हे जुलै-नोव्हेंबरच्या आकड्यांवरूनच हे कळून आले. या रिपोर्टद्वारे दिसून येते कि, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी जानेवारी 2022 मध्ये 3 टक्के आणि दुसरी 4 टक्के वाढ जुलैपासून लागू झाली. 7th Pay Commission

7th pay commission: Big news! Arrears will be paid, up to 40,000 rupees will come in the account in July, know details - Business League

महागाई भत्त्यामध्ये वाढ केव्हा होते ???

केंद्र सरकारकडून दर वर्षीच्या सुरुवातीला आणि वर्षाच्या मध्यात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोनवेळा वाढ केली जाते. सहसा ते 1 जानेवारी आणि 1 जुलैपासून लागू होईल असे मानले जाते. केंद्र सरकारचे 48 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शन धारकांना याचा फायदा मिळतो. तसेच यावर्षी होळी आधी मार्च महिन्यात DA मध्ये वाढ होणार असल्याचे म्हंटले जात आहे. 7th Pay Commission

7th Pay Commission: Good news! Salary of government employees may increase up to Rs 21,622, Know 38% DA Update - Business League

महागाई भत्ता म्हणजे काय ???

महागाई भत्ता हा राहणीमानाच्या समायोजनाचा खर्च आहे, जो केंद्र सरकारकडून सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिला जातो. महागाईचा प्रभाव रोखण्यासाठी मूळ पगाराची (Basic Salary) टक्केवारी म्हणून त्याची गणना केली जाते. केंद्र सरकारने गेल्या वर्षी दिवाळी आधी DA मध्ये वाढ केल्याची घोषणा केली होती. 7th Pay Commission

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://doe.gov.in/seventh-cpc-pay-commission

हे पण वाचा :
Budget 2023 : विदेशी खेळणी महागणार, खेळण्यांवरील आयात शुल्कात झाली 70% वाढ
IRCTC North East Tour Package : ईशान्येला फिरायला जाण्यासाठी रेल्वे देत आहे सुवर्ण संधी, जाणून घ्या सर्व तपशील
LIC Dhan Varsha Plan मध्ये गुंतवणूक करून मिळवा 10 पट नफा, अशा प्रकारे तपासा यासाठीची पात्रता
आता Driving Licence शिवाय चालवता येणार गाडी !!! सरकारने सुरु केली ‘ही’ सुविधा
IRCTC North East Tour Package : ईशान्येला फिरायला जाण्यासाठी रेल्वे देत आहे सुवर्ण संधी, जाणून घ्या सर्व तपशील