हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (7th Pay Commission) नुकतीच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी समोर आली आहे. येत्या महिन्यात होळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. माहितीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) हा एकूण ४ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. ज्यामुळे महागाई भत्ता आणि महागाई आराम (DR) हा ४६ टक्क्यांवरून थेट ५० टक्के इतका वाढेल. एका वृत्तानुसार, केंद्र सरकार याबाबत मार्चमध्ये घोषणा करण्याची तयारी करत आहे. त्यामुळे १ जुलै २०२४ पासून वाढीव भत्त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
कोणाला होणार फायदा? (7th Pay Commission)
कामगार मंत्रालयाचा लेबर ब्युरो विभाग हा दर महिन्याला CPI- IW डेटा प्रकाशित करतो. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता हा CPI डेटाच्या आधारे ठरवलेला असतो. सध्या CPI डेटाची १२ महिन्यांची सरासरी ३९२.८३ इतकी आहे. यानुसार, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता म्हणजेच डीए मूळ वेतनाच्या ५०.२६ टक्के असेल.
(7th Pay Commission) सरकारच्या या निर्णयाचा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक दोघांनाही मोठा फायदा होणार आहे. कारण केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सरकारकडून महागाई भत्त्यासोबतच पेन्शनधारकांच्या महागाई सवलतीतदेखील वाढ केली जात आहे. परिणामी, या वाढीचा फायदा सुमारे ४८.६७ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६७.९५ लाख पेन्शन धारकांना होणार आहे.
कधी होणार वाढ?
सहसा दरवर्षी, DA आणि DR जानेवारी आणि जुलैमध्ये दोनदा वाढवले जातात. याची शेवटची वाढ ऑक्टोबर २०२३ मध्ये झाली होती. त्यावेळी DA ४ टक्के वाढवला होता. ज्यानुसार तो ४६ टक्क्यांवर होता. आता पुन्हा एकदा DA मध्ये ४ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. (7th Pay Commission) जी येत्या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये होऊ शकते. सरकारने मार्चमध्ये महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा केली आहे. मात्र त्याची अंमलबजावणी जानेवारीपासून होईल. ज्यामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना मागील महिन्यांचीदेखील थकबाकी मिळणार आहे.
किती पगार आणि किती पेन्शन वाढणार?
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत यामध्ये ४ टक्क्यांनी वाढ होणार. म्हणजेच जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन प्रत्येक महिन्याला ५३,५०० रुपये इतके असेल. (7th Pay Commission) तर ४६ टक्क्यांनुसार त्याचा आत्ताच महागाई भत्ता २४,६१० रुपये इतका होईल. यात आता DA ५० टक्क्यांनी वाढल्यानंतर ही रक्कम २६,७५० रुपये इतकी होणार आहे. म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार हा २,१४० रुपये प्रति महिना इतका वाढेल.
तसेच केंद्र सरकारच्या पेन्शन धारकांना प्रत्येक महिन्याला ४१,१०० रुपये मूळ पेन्शन आहे. यावर आत्ता ४६ टक्के DR दर सुरु असल्याने पेन्शन धारकांना १८,९०६ रुपये मिळतात. त्यांचा DR ५० टक्क्यांनी वाढल्यामुळे आता दरमहा २०,५५० रुपये मिळतील. म्हणजेच DA मध्ये ४ टक्क्यांनी वाढ झाल्यास त्यांची पेन्शन १,६४४ रुपय प्रति महिना वाढेल. (7th Pay Commission)