प्रतिनिधी । राज्यात २० लाख ५० हजार शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषदेचे कर्मचारी, अनुदानप्राप्त संस्थांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ १ जानेवारी २०१९ पासून मिळणार आहे. सध्याच्या वेतनातील ही वाढ अंदाजे २३ टक्क्यांएवढी आहे, असे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुंगट्टीवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती देतांना सांगितले.
१ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोगाच्या तरदूती लागू होतील. सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीन वर्षांची थकबाकीची रक्कम २०१९-२० पासून समान पाच हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये व प्रकरण परत्वे उचित निवृत्तीवेतन योजनेत जमा करण्यात येणार आहे. तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ही थकबाकी पुढील आर्थिक वर्षापासून समान पाच हप्त्यांमध्ये रोखीने देण्यात येणार आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम ३८,६५५ कोटी रु. प्रत्यक्ष लाभ जाने. २०१९ पासून देण्यात येणार असल्यामुळे दरवर्षी २४,४८५ कोटी रुपयांचा अतिरिक्त वित्तीय भार पडणार आहे.
- सातवा वेतन आयोगाचा लाभ १ जानेवारी २०१९ पासून मिळणार लाभ
- १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोगाच्या तरदूती लागू
- सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीन वर्षांची थकबाकीची रक्कम २०१९-२० पासून समान पाच हप्त्यांमध्ये
- सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ही थकबाकी पुढील आर्थिक वर्षापासून समान पाच हप्त्यांमध्ये