मनपाचा हलगर्जीपणा !! 20 कोटींच्या थकबाकीत तब्बल 8.67 कोटी दंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : मनपाने जायकवाडी उपसा केंद्रात केवळ 30 हजार रुपयांचे पाण्याचे मीटर न बसवल्याने दंड म्हणून 4.15 कोटी रुपये तर नियमित पाणीपट्टी न भरल्याने पालिकेला 2.96 कोटीचे विलंब शुल्क भरावे लागणार आहे. 20 कोटी च्या थकबाकीत 8.67 कोटी रुपये निव्वळ दंडाची रक्कम असल्याचा प्रकार समोर आला आहे.

जायकवाडी पाटबंधारे विभाग मनपाला जायकवाडी धरणातून पाणी पुरवठ्यासाठी महिन्याला 22 ते 25 लाख रुपयांची पानपट्टी आकारतो पालीका ही रक्कम भरत नसल्याने दरमहा पाणी बिलास सोबत थकबाकीची नोटीसही पाठवली जाते. मात्र पालिका दुर्लक्ष करते. यामुळेच थकबाकी 20 कोटींपेक्षा जास्त झाल्यामुळे पाटबंधारे अधिनियम 1976 च्या कलम 97 (1) मधील तरतुदी व कलम 49 मधील निर्देशानुसार पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे.

थकबाकीच्या 40 टक्के दंड

पाटबंधारे विभागाने पालिकेला दिलेली नोटीस यातील आकडेवारी धक्कादायक आहे. पालिकेला जुन्या आणि नवीन अशा दोन योजनेतून पाणीपुरवठा होतो. पैकी डिसेंबर 2020 अखेर नवीन योजनेचे 14 कोटी 13 लाख 84 हजार रुपये थकले आहेत यात 7.47 कोटी पाणी वापर शुल्क एक पॉईंट 52 कोटी स्थानिक कर आहे तर पाण्यावर मीटर बसवल्याने 4.15 कोटी दंड व पाणीपट्टी थकवली याबद्दल 2 कोटींचे निलंबन शुल्क लावण्यात आले आहे. जुन्या योजनेच्या 6 कोटी 43 लाख रुपयांच्या थकबाकीत 2.96 कोटी पाणीवापर शुल्क 65 लाख स्थानिक कर व मीटर बसवण्यासाठी 1.56 कोटी रुपयांचा दंड आहे. याशिवाय 96 लाख रुपये विलंब शुल्कही लावण्यात आले आहे. दोन्ही योजनांतील मीटर न बसवणे आणि विलंब शुल्कापायी 8.67 कोटी म्हणजे मूळ थकबाकीच्या 40 टक्के रक्कम प्रशासनाला भरावे लागणार आहे.

30 हजारांचे मीटर बसवलेच नाही

महाराष्ट्र जलसंपत्ती अधिनियम 2005 नुसार पाणी उपसा करण्यासाठी पाणीमापक यंत्र म्हणजेच वॉटर मीटर बसविणे अनिवार्य आहे. मिटर नसेल तर पाणी पुरवठा योजना तांत्रिकदृष्ट्या अनधिकृत ठरते. तसेच थकबाकीच्या दीड पट दंड लावण्याची तरतूदही आहे.पाटबंधारे खात्यातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार बाजारात 12 हजारापासून 50 हजार रुपयापर्यंत मीटर उपलब्ध आहेत. यातील सरासरी 30 हजारांचे मीटर बसवले तरी काम भागते. मात्र, पाटबंधारे पत्राकडे दुर्लक्ष केल्याने दंड भरण्याची वेळ पालिकेवर आली आहे. सर्वसामान्यांच्या कराच्या रकमेतून दंड भरावा लागेल.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment