उन्हाळ्याच्या कडक उन्हात शरीर थंड ठेवायचं असेल, तर ताकापेक्षा उत्तम पर्याय नाही. भारतीय आहारात ताकाला विशेष स्थान आहे. आयुर्वेदातही ताकाचे अनेक औषधी गुणधर्म सांगितले आहेत. दहीपासून तयार होणारे हे सत्त्वयुक्त पेय पचनासाठी उत्तम असून, शरीराला थंडावा देणारे आहे. नियमित ताक पिण्याचे अनेक फायदे आहेत. चला जाणून घेऊ या:
शरीराला थंडावा देते
उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी ताक खूप फायदेशीर आहे. रोज ताक प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि शरीर ताजेतवाने राहते.
पचनासाठी उत्तम
ताकामध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक्स असतात, जे पचनसंस्था सुदृढ ठेवतात. गॅस, अपचन, अॅसिडिटी सारख्या त्रासांवर ताक हा घरगुती उपाय आहे.
शरीरातील पाण्याची पातळी राखते
उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अशावेळी ताक पिल्याने शरीर हायड्रेट राहते आणि उष्णतेचे दुष्परिणाम टाळता येतात.
पोषणमूल्यांचा खजिना
ताकात कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी१२, लैक्टिक अॅसिड यांसारखी पोषणमूल्ये मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे हाडे मजबूत होतात आणि थकवा दूर होतो.
वजन नियंत्रणात मदत
ताक हे लो-कॅलरी आणि लो-फॅट पेय आहे. पचन सुधारल्याने वजन वाढत नाही. तसेच, ताक प्यायल्याने पोटभरल्यासारखं वाटतं आणि अन्नाचे क्रेविंग कमी होते.
त्वचेसाठी फायदेशीर
ताकात असलेले लैक्टिक अॅसिड त्वचेसाठी फायदेशीर आहे. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकून त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवते.
उष्णतेच्या त्रासावर रामबाण उपाय
उन्हाळ्यात घामोळ्या, डिहायड्रेशन, नाकातून रक्त येणे यांसारख्या समस्यांवर ताक उपयुक्त आहे. शरीरातील उष्णतेचा त्रास कमी करून थंडावा देते.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते
ताकात असलेल्या प्रोबायोटिक्समुळे पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांमधील चांगल्या जिवाणूंचे प्रमाण वाढते. याचा थेट परिणाम रोगप्रतिकारशक्तीवर होतो.
ताणतणाव कमी करते
उन्हाळ्यातील उष्णतेमुळे होणारा थकवा, अस्वस्थता यावर ताक खूपच उपयुक्त आहे. ताक पिल्याने शरीराला शांत वाटते आणि मनही प्रसन्न राहते.
कसे प्यावे ताक?
रोज दुपारी किंवा जेवणानंतर १ ग्लास ताक प्या.
त्यात जिरेपूड, सैंधव मीठ, पुदिना, आलं घालून प्यायल्यास अतिरिक्त फायदे मिळतात.
प्रिझर्व्हेटिव्हयुक्त ताक ऐवजी घरी बनवलेले ताजे ताक अधिक फायदेशीर असते.