मुंबईत ८ बेस्ट कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील मुंबई हे शहर कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक त्रस्त असलेल्या शहरांपैकी एक आहे. येथे कोरोना विषाणूमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे तसेच मोठ्या संख्येने लोकांना कोरोना विषाणूची लागणही झालेली आहे. यादरम्यानच, आता मुंबईतील बेस्ट बस सर्व्हिसच्या कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याची घोषणा केली आहे. खरं तर, कोरोना विषाणूमुळे बेस्टच्या ८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, त्यानंतर सर्व बेस्ट कर्मचार्‍यांनी आज संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

BEST strike continues for 2nd day; thousands inconvenienced - The ...

कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये सेवा बजावत असताना बेस्ट बसमधील ८ कर्मचार्‍यांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. बेस्टचे सुमारे ३६,००० कर्मचारी बसेस चालवतात, अशा स्थितीत जर हा संप केला गेला तर मुंबईची सगळी वाहतूक सेवा विस्कळीत होईल, त्यामुळे लोकांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. सुमारे २८,००० बेस्ट युनियनचे कर्मचारी आहेत,  हे सर्वजण संपावर जातील असे सांगण्यात आले आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशभरात कोरोना विषाणूची लागण होण्याच्या ९६,१६९ घटना घडल्या आहेत, तर या संसर्गामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा हा ३०२९ वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला असून एकूण ३३०५३ रुग्णांची नोंद झाली आहे तसेच गेल्या २४ तासांत २३४७ नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यात कोरोनामुळे ११९८ लोकांचा मृत्यूही झालेला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment