Thursday, February 2, 2023

कृष्णा नदीकाठी 8 फूटी मगर विश्रांतीला, प्रशासन सतर्क

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील टेंभू येथील कृष्णा नदीत 8 फूटी मगरीचा वावर वारंवार दिसून येत आहे. काल चक्क या मगरीने नदीकाठी विश्रांती घेतली. तिचा व्हिडिअो मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे आता टेंभूसह परिसरातील गावातील ग्रामस्थांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसापासून भल्या मोठ्या मगरीचा वावर असून या मगरीचे दर्शन वारंवार शेतकरी ग्रामस्थ तसेच मच्छीमारांनाही होत आहे. बहुसंख्य वेळा कृष्णा नदीच्या काठावर ही मगर विश्रांती घेत असल्याचेही शेतकऱ्यांनी पाहायले आहे. या मगरीची विश्रांती कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. याबाबत टेंभू पोलीस पाटील यांनी वन विभागाशी संपर्क करून याबाबतची माहिती दिली. वन विभागाने या बाबीची गंभीर दखल घेत टेंभू येथील कृष्णा नदीच्या काठावर मगर प्रवण क्षेत्र असा फलक लावला आहे. सर्व शेतकरी ग्रामस्थ मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये या भल्या मोठ्या मगरीचे दर्शन ग्रामस्थांना झाले आहे. नदीकडे जाताना ग्रामस्थ शेतकरी व मच्छीमारांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.