Homeopathic medicine घेतल्यानंतर एकाच कुटुंबातील 8 जणांना गमवावा लागला आपला जीव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बिलासपूर : वृत्तसंस्था – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. प्रत्येक जण कोरोनापासून आपला बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा सर्वात अगोदर कोरोना महासाथीचा उद्रेक झाला, त्यावेळी त्यापासून संरक्षण करण्यासाठी लोकांनी अनेक मार्ग शोधून काढले. त्यावेळी लोकांनी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर दिला होता.

या दरम्यान होमिओपॅथिक औषधांचे वाटप करण्यात येत होते. त्यावेळी कित्येक लोकांना होमिओपॅथिक औषधे देण्यात येत होती. आता हेच होमिओपॅथिक औषध घेतल्यानंतर एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना छत्तीसगडमधील बिलासपूर या ठिकाणी घडली आहे. या मध्ये एकाच कुटुंबातील 8 जणांनी होमिओपॅथिक औषधाचे सेवन केले. त्यानंतर त्या 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 5 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून हि माहिती देण्यात आली आहे. “या लोकांनी ड्रोसेरा 30 हे होमिओपॅथिक औषध घेतलं होते. ज्यामध्ये 91% अल्कोहोल होते. हे औषध देणारा डॉक्टर फरार झाला आहे” अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Leave a Comment