गोंदियात बसचा भीषण अपघात; 8 लोक जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गोंदिया तालुक्यातून एक मोठी गंभीर घटना समोर येत आहे. ती म्हणजे गोंदियातील अर्जुनी तालुक्यातील खजुरी गावाजवळ एक मोठा अपघात झालेला आहे. शिवशाही बसला हा अपघात झालेला आहे. आणि या अपघातात आतापर्यंत 8 जण मृत्यू झाल्याची माहिती हातात आलेली आहे. तसेच या बसमधील 10 ते 15 प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत.

अपघातात झालेल्या या बसमधील प्रवाशांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलेले आहे. तसेच अपघाताच्या स्थळी पोलीस आणि प्रशासन देखील पोहोचलेले आहेत. आणि तेथील बचाव कार्य अजूनही सुरू आहे. ही शिवशाही बस नागपूरच्या दिशेने गोंदियात जात होती. त्यावेळी बस रस्त्यावर पलटी झालेली आहे. खजुरी या गावाजवळ हा अपघात झालेला आहे. अत्यंत दुर्गम भागात हा अपघात झाल्याने त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि पोलीस अधिकारी पोहचण्यास जरा उशीर झालेला आहे. तसेच या अपघातात आता पर्यंत 10 ते 15 लोक गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आलेली आहे.

आतापर्यंत अपघातात झालेल्या या शिवशाही बस मधून 9 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत. आणि मृतांचा हा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. गोंदिया बस अपघातात झालेल्या मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत मिळावी. असे आदत आदेश काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन प्रशासनाला दिलेले आहेत.